स्वारगेट बस्थानक सुरक्षा केबिनची शिवसैनिकांकडून तोडफोड….
प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे:- पुणे विद्येचे माहेरघर, पुणे हिरवेगार शांत शहर ही प्रतिमा आता संपुष्टात येऊन पुणे आता गुन्हेगारिचे हब झाले आहे , आज पहाटे स्वारगेट बसस्थानकात एका तरुण युवतीवर शिवशाही बस मधे बलात्कार करून अत्याचार करण्यात आले आणि पुणे शहराचे वातावरण तापले कारण चोवीस तास माणसांची वर्दळ असणारे ह्या बसस्थानकाची सुरक्षा व्यवस्था ढिसाळ झाली आहे हे ह्या घटनेतून दिसून आले, समोरच पोलिस स्टेशन असूनही गुन्हेगारांमध्ये भय नाही हे प्रामुख्याने दिसते .
सदर घटना शिवसैनिकांना कळताच शिवसेना महिला आघाडीच्या वतीने स्वारगेट बसस्थानकात सर्व महिला पदाधिकारी मोठ्या प्रमाणात जमल्या शिवसेना महिला आघाडी, युवती सेना पदाधिकारी यांच्या वतीने महिला सुरक्षा, पोलिस यंत्रणा, परिवहन मंडळाची सुरक्षा व्यवस्था आणि आरोपी यांच्या विरोधात निदर्शने करून आंदोलन करण्यात आले, तसेच राज्य संघटक वसंत मोरे आणि शिवसैनिकांनी यावेळी स्वारगेट परिवहन मंडळाचे सुरक्षा रक्षक केबिन फोडून टाकले आणि प्रशासनाचा निषेध केला .
यावेळी परिवहन मंत्री सरनाईक , गृहमंत्री फडणवीस यांच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित केले गेला.
यावेळी आंदोलनास शिवसेना राज्य संघटक वसंत मोरे, युवती सेनेच्या निकिता मराटकर, संघटिका रेणुका साबळे, मृणमयी लिमये, महिला आघाडीच्या वैशाली दारवटकर, अमृता पठारे, विद्या होडे, जयश्री भणगे, मेधाताई पवार, प्रांजल झगडे, आरती बरीदे, गौरी चव्हाण, पद्मा सोरटे, स्नेहल पाटोळे, दिपाली राऊत, सुलभा तळेकर, ज्योती वीर, प्रज्ञा लोणकर, स्मिता राजणे, मनीषा कुलकर्णी, मनीषा गरुड, मेधा पवार, रुपाली आलमखाने, पूजा भोकरे, सिद्धी गवळी, राणी शिलारखाने, मेघा मुंगले, पद्मा भोकरे, पूनम गंजकर, रुपाली जिंतीकर, रुपाली गावडे, सरोज कर्वेकर, भारती दामजी, सविता गोसावी, अनुपमा मांगडे, रोहिणी मडोळे, गौरी शेलार, शिवसेनेचे पर्वती विभाग प्रमुख सूरज लोखंडे, संघटक पराग थोरात, प्रसिद्धी प्रमुख अनंत घरत, नितीन जगताप, संतोष भुतकर, मुकुंद चव्हाण ,अमर मराटकर, आरोग्य सेनेचे रमेश क्षीरसागर, दिलीप पोमन, राकेश बोराटे, जुबेर शेख, अक्षय हबीब, शाम जांभूळकर, सागर दरवडे, असंख्य शिवसैनिक , नागरिक उपस्थित होते.
अनंत रामचंद्र घरत
प्रसिद्धी प्रमुख पुणे..