प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे : विशेष प्रतिनिधी :
पुणे न्यायालयात झालेल्या सुनावणीनंतर दत्ता गाडेच्या वकिलांनी सांगितले की, 'बलात्कार झालाचं नाही. जे झालं ते दोघांच्या संमतीने झाले. दत्ता गाडे आणि ती मुलगी एकमेकांना एक महिन्यापासून ओळखतात. त्यांचे कॉल रेकॉर्डस काढले तर समजेल. बसमधून दोघे एकत्रच उतरले. बसमधून उतरुन दोघे कुठे गेले याची माहिती घेण्यात यावी, तसेच दोघांमध्ये पैशाचा वाद झाला. दत्ता गाडे पळून गेला नाही तर त्याच्या गावी गेला होता.'
पुढे बोलताना वकिलांनी, 'आपण सीसीटीव्ही फुटेज पाहिलं, तर ती तरुणी आरोपीच्या मागे मागे जात आहे. आरोपी तिला घेऊन जाताना जबरदस्ती करत नाही. तसेच बसमधून उतरतानाही आधी आरोपी खाली येतो, त्यानंतर ती येते. इथे अवघ्या 50 मीटर अंतरावर स्वारगेट पोलीस स्टेशन असताना ती तिथे तक्रार करण्यासाठी तिथे गेली नाही. त्यानंतर ती स्वत:च्या गावाकडे गेली,' अशी माहिती दिली.
पुणे बलात्कार प्रकरणाती आरोपी दत्ता गाडे याचे राजकीय नेत्यांशी संबंध असलेल्याचे समोर आले आहे. आरोपीचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांसोबतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. व्हायरल फोटोमध्ये आरोपी दत्ता गाडे हा हवेली विधानसभा मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार माऊली कटके आणि माजी आमदार अशोक पवार यांच्या सोबत दिसत आहे.
आरोपी हा हवेलीचे आमदार माऊली कटके यांचा कार्यकर्ता असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. मात्र, आमदार माऊली कटके आणि अशोक पवार यांनी हा आरोप फेटाळला आहे. एक लोकप्रतिनिधी म्हणून परिसरातील अनेक लोक भेटत असतात. आमच्यासोबत फोटो घेत असतात, असे आमदार कटके यांनी म्हटलं आहे. आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी, अशी मागणी देखील आमदार कटके यांनी केली आहे.