स्वारगेट बसस्टँड परिसरातील लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपीला अखेर पोलिसांनी अटक केली.

 

प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे : प्रतिनिधी :

पुणे : स्वारगेट बसस्टँड परिसरातील लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपीला अखेर पोलिसांनी अटक केली. शिरूर तालुक्यातील गुनाट गावातून बेड्या ठोकण्यात आल्या. दत्तात्रय गाडे असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास त्याला अटक करण्यात आली आहे.

पुण्यातील शिरुरच्या गुनाट गावच्या ग्रामस्थांच्या मदतीने पुणे बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडे पुणे पोलिसांना शरण गेला. बलात्कार प्रकरणातील दडपण, ग्रामस्थांची भिती यातून आरोपी दत्ता गाडे आत्महत्या करण्याच्या तयारी होता.दत्ता गाडे टाकोचा पाऊल उचलणार होता, पण गुनाट ग्रामस्थांनी दत्ता गाडे याला बोलण्यात गुंतवले. दत्ता गाडे बोलण्यात गुंतवल्यानंतर गावकऱ्यांनी त्याला पकडले. त्यावेळी दत्ता गाडे याच्या हातात रोगर औषधाची बॉटल आढल्याचा दावा गुनाट गावकऱ्यांनी केला. दत्ता गाडे याच्या कृतीचे समर्थन नाही, मात्र गावची बदनामी आणि गावाला पोलीस छावणीचे आलेले रुप यामुळे ग्रामस्थ भयभीत होते, असेही काही गावकऱ्यांनी सांगितले.

पुण्याच्या शिरुर तालुक्यातील गुनाट गावात दत्ता गाडेची शोध मोहिम रात्रीच्या अंधारात सुरूच होती. ऊसाच्या शेतात डॉग स्कॉड , ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून रात्रीच्या अंधारातही दत्ता गाडे याचा शोध घेण्यात येत होता. त्याचवेळी दत्ता गाडे गावात आला, पाणी घेतलं आणि भिती व्यक्त करून पुन्हा शेतात लपला. ज्या घरात दत्ता गाडे पाणी प्यायला गेला, त्या घरातील एका महिलेने दत्ता गाडे याच्याबाबत पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पुणे पोलीसांकडून ड्रोनच्या माध्यमातून दत्ता गाडे याला सरेंडर होण्याचे आव्हान केले. पण काही केल्या दत्ता गाडे पुढे येत नव्हता. गुनाट गावकऱ्यांनी पुढाकर घेत दत्ता गाडे याच्याशी संपर्क साधला अन् पोलिसांना स्वाधीन होण्यास त्याला भाग पाडले.

Post a Comment

Previous Post Next Post