प्रेस मीडीया लाईव्ह वृत्त वाहीनी चे मुख्य संपादक मेहबूब सर्जेखान यांना आदर्श संपादक प्रेरणा पुरस्कार जाहीर.

पुरस्कार जाहीर झाल्याने प्रेस मीडीया लाईव्ह च्या सर्व प्रतिनिधीचा जल्लोष तर विविध क्षेत्रातुन मेहबूब सर्जेखान यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव.

---------------------------------------- 


प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे  : चंद्रशेखर पात्रे :

 निसर्ग राजा ग्रुपच्या वतीने सालाबाद प्रमाणे शिवजयंती व महाशिवरात्री यात्रा आणि जागतिक महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांचे प्रेरणा पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे.

 यंदा नावाजलेल्या व अग्रेसर असलेल्या पुण्याचे प्रेस मीडिया लाईव्ह या वृत्तवाहिनीचे मुख्य संपादक महबूब सर्जेखान यांना *आदर्श संपादक प्रेरणा पुरस्कार* ने सन्मानित करण्यात येणार असल्याचे दैनिक महासत्ता चे वार्ताहर व निसर्ग राजा ग्रुपचे अध्यक्ष शिवाजी येडनाव यांनी प्रेस मीडिया लाईव्ह चे प्रतिनिधी चंद्रशेखर पात्रे यांना माहिती देताना दिली. 

हा पुरस्कार दिनांक 26 फेब्रुवारी 2025 रोजी श्री मलकार सिद्ध मंदिर, महादेव मंदिर मागे, मलकापूर तालुका निपाणी, जिल्हा बेळगाव, कर्नाटक राज्य येथे हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे *आदर्श संपादक* पुरस्कार जाहीर झाल्याने प्रेस मीडिया लाईव्ह चे सर्व प्रतिनिधीच्या वतीने आनंद व्यक्त करण्यात येत आहे पुरस्कार जाहीर झाल्याने मुख्य संपादक मेहबूब सर्जेखान यांच्यावर सर्व स्तरावरून अभिनंदनचा वर्षा होत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post