प्रेस मीडिया लाईव्ह
डॉ. तुषार निकाळजे यांनी दिग्दर्शित व निर्मिती केलेल्या "रिटायर्ड बर्ड नॉट टायर्ड" या लघु चित्रपटाची आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात निवड झाली आहे
रिटायर्ड बट नॉट टायर्ड'" या लघु चित्रपटात डॉ. तुषार निकाळजे या भारतातील शिक्षकेतर- कर्मचाऱ्याचा सेवानिवृत्तीनंतरचा कौटुंबिक, शैक्षणिक, संशोधनात्मक प्रवासाचे चित्रण केले आहे. "कौटुंबिक, सामाजिक व देश कल्याणाची कामे सेवानिवृत्तीनंतरही करता येऊ शकतात", हा संदेश या लघु चित्रपटामधून देण्यात आला आहे. या चित्रपटास स्लोव्हाक देशातील कोसिस इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल या संस्थेने आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात निवड केली आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण व संकलन श्री. शुभम महादेव यांनी केले आहे . यापूर्वी या लघु चित्रपटाची नोंद क्रेडेन्स बुक ऑफ इंटरनॅशनल रेकॉर्डमध्ये झाली आहे.
डॉ. तुषार निकाळजे वर्ष 2022 मध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे येथून शिक्षकेत्तर- कर्मचारी म्हणून सेवानिवृत्त झाले आहेत. डॉ. निकाळजे सेवानिवृत्तीनंतरही शैक्षणिक व संशोधनात्मक कामात व्यस्त आहेत.