आरोपी दत्तात्रय गाडे याचा ड्रोन कॅमेरा मार्फत शोध सुरू

 


प्रेस मीडिया लाईव्ह : ,

पुणे : विशेष प्रतिनिधी :

पुणे : स्वारगेट येथे 26 वर्षे तरुणीवर अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे याचा शोध पोलिसांकडून सुरू केला आहे. त्याची माहिती देणाऱ्यास एका लाखाचे बक्षीस जाहीर केले आहे. आरोपी दत्तात्रय गाडे हा ऊसाच्या शेतामध्ये लपून बसल्याची माहिती पोलिसांना खबऱ्याकडून मिळाली. त्यानंतर पुणे शहर पोलिसांकडून ड्रोनद्वारे ऊस शेतामध्ये त्याचा शोध सुरू आहे. या ठिकाणी असलेल्या घरात आरोपी दत्तात्रय गाडे हा पाणी पिण्यासाठी आल्याची माहिती मिळाली.

आरोपी दत्तात्रय गाडे गुन्हा केल्यानंतर बसने त्याच्या शिरूर तालुक्यातील गुनाट गावी आला. सकाळी ११ वाजता तो घरी आला. घरी आल्यावर त्याने शर्ट बदलला. त्यानंतर संध्याकाळी पाच वाजता गुन्हा दाखल झाल्यावर तो फरार झाला. त्याचे शेवटचे लोकेशन शिरुर असल्याचे मोबाईलवरुन दिसून आले. त्यानंतर बाहेर पाडला.

 दत्तात्रय गाडे याच्या भावाला ताब्यात घेतले आहे. तसेच या प्रकरणात 40 जणांची चौकशी करण्यात आली आहे. पोलिसांच्या 13 टीम त्याचा विविध ठिकाणी शोध घेत आहेत. बस स्थानक, रेल्वे स्टेशन येथे शोध घेतला जात आहे. तसेच टेकनिकल विश्लेषण केले जात आहे. गुन्हा घडला तेव्हा त्याने चेहऱ्यावर मास्क लावला होता. त्यामुळे सीसीटीव्हीत त्याचा चेहरा व्यवस्थित दिसत नाही. परंतु पोलिसांना त्यांच्यासंदर्भातील इतर महत्वाचे पुरावे मिळाले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post