गुंड गजा मारणेसह चौघांवर मकोका

 


प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे : येथे नुकतेच केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ  यांच्या कार्यालयातील एका मुलाला मारहाण झाल्याची घटना घडली होती. वाढत्या गुन्हेगारीमुळे पुणे शहरात दहशतीचं वातावरण आहे.तर मोहोळ यांच्या कार्यालयातील मुलाला मारहाण झाल्याप्रकरणी पोलीस तपास करत होते. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली होती. त्यांच्यावर आता मकोका लावल्याची माहिती पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिलीय,

केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यालयातील मुलाला मारहाण करणाऱ्या आरोपींवर मकोका लावला, अशी माहिती पुणे पोलीस आयुक्तांनी दिली आे. सोबतच गजा मारणे टोळीवर देखील मकोका लावलाय. टोळी प्रमुख गजानन मारणेवर देखील  कारवाई करणार, असं पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी म्हटलंय.यापुढे काही गुन्हे केले तर पोलीस सोडणार नाही. गुन्हेगारांना कसं नेस्तनाबूत करायचं हे आम्हाला चांगलं माहीत आहे. आम्हाला जनतेची भीती आहे. आमच्यावर कुणाचा दबाव नाही. फक्त जनतेला शांततेचं वातावरण करण्यासाठी दबाव आहे. शहरात कधी कधी काही घटना घडतात, पण आमचा प्रयत्न आणि सुव्यवस्था चांगली आहे. लोकप्रतिनिधी सोबत आमचे चांगले संबंध आहेत, अशी माहिती पत्रकार परिषदेत पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post