पतीच्या मानेवर हातावर कोयत्याने वार महिला आरोपीला अटक.
प्रेस मीडिया लाईव्ह :
चंद्रशेखर पात्रे :
पुणे दि :- मातृत्वाला लाजणारी आणि ह्दय पिटाळून लावणारी गोष्ट दौंड तालुक्यात घडली आहे दौंड तालुक्यातून अतिशय धक्कादायक बातमी आहे एका महिलेने चक्क आपल्या पोटच्या दोन चिमुकल्यांचा गळा दाबून हत्या केल्याने संपूर्ण दौंड तालुका हादरले आहे यासोबतच या महिलेने आपल्या पतीवर देखील कोयत्याने वार केले आहेत. शंभू दुर्योधन मिढे (वय-१ वर्ष) आणि पियू दुर्योधन मिढे (वय -३ वर्ष) अशी मृत्यू झालेल्या मुलांची नावे आहेत.
या महिलेने तिचा पती दुर्योधन आबासाहेब मिढे (वय-३५) याला देखील कोयत्याने मानेवर व हातावर वार करून जखमी केले आहे. दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली येथे ही धक्कादायक घटना घडली. याप्रकरणी दौंड पोलिसांनी ३० वर्षीय आरोपी महिलेला अटक केली आहे. पती-पत्नीच्या वादातून आणि सासरच्या जाचाला त्रासून महिलेने हे टोकाचे पाऊल उचलण्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.
आज शनिवार (दि.८) पहाटेच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली आहे. काळजाचा थरकाप उडवणारी ही घटना समजताच परिसरात एकच खळबळ उडाली. दौंड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गोपाळ पवार आणि कुरकुंभ चौकीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील तातडीने घटनास्थळी दाखल झाले. या घटनेचा पोलीस अधिक तपास करीत आहेत.