आरोपींचे वकीलाचे युक्तिवाद कोणत्याही जबरदस्ती तरूणीवर केले नाही दोघांच्या सहमतीने शारीरीक संबंध झाले
प्रेस मीडिया लाईव्ह :
विशेष प्रतिनिधी : चंद्रशेखर पात्रे :
पुणे दि. स्वारगेट बस स्थानकावर एका २६ वर्षीय मुलीवर बलात्कार झाल्याची घटना घडली होती या प्रकरणामुळे संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली आहे महिलांच्या सुरक्षेचे प्रश्न ऐरणीवर आले आहे बाबत चांगलेच राजकारण तापले आहे तर पोलीसांन वरती ही ताशेरे ओढले जात आहे तसेच येथे स्वारगेट बस स्थानकावर काम करीत असलेल्या पुणे जिल्हा सुरक्षा रक्षक मंडकाचे २३ सुरक्षा रक्षकांचे तडकाफडकी बदली करण्यात आले आहे तर सुरक्षाव्यवस्थेवर प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे, तसेच राज्य मंत्री कदम यांनी ही याबाबत मुक्ताफळे उधळली आहे बलात्कार होताना मुलीने कुठल्याही प्रकारची आरडाओरडा केला नाही असे मुक्ताफळे उधळली असल्याने यावर राजकारण अधिक तापले आहे तर विविध सामाजिक संघटनानी याबाबत जाहीर निषेध व्यक्त करत आंदोलन केले आहे आता आरोपी दत्ता गाडे याला अटक करून न्यायालयात हजर केले असता दत्तात्रय गाडेला १२ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आले आहे, स्वारगेट पोलिसांच्या तपास पथकाने ही कारवाई केली असून त्याला आज दि. २८ त्याला न्यायालयात हजर केले असता न्यालयाने आरोपी दत्ता गाडेने याला १२ दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे याला पोलिसांनी मध्यरात्री दीड वाजता अटक केली. गेल्या चार दिवसांपासून आरोपी गाडे याचा आठ पोलीस पथक असे पन्नास पोलीस शोध घेत होते.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी दत्ता गाडेने यांनी पोलिस कोठडीत टाहो फोडला आहे माझे चुकले, मी पापी आहे, असे म्हणत तो रडत असल्याचे पुढे आले आहे. तसेच मी तरुणीवर अत्याचार केला नाही. आमचे सहमतीने संबंध झाले, असा दावाही आरोपीने यावेळी केला असल्याचे सांगण्यात आले आहे. तर आरोपीचे वकील यांनी ही जोरदार युक्तिवाद करत आरोपीनी कुठलेच जबरदस्ती केली नसुन दोघांच्या संमतीने शारीरिक संबंध झाल्याचे सांगितले परंतु न्यायालयाने आरोपीला १२ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे आता पोलीस कोठडी मिळाल्याने आरोपी कडुन अजुन काही गोष्टी उघड होतील याकडे सर्वांचे लक्ष वेधून आहे.