प्रेस मीडिया लाईव्ह :
पुण्यातील स्वारगेट एसटी स्थानकात शिवशाही बसमध्ये २६ वर्षाच्या तरुणीवर एका नराधमाने अमानुष बलात्कार केला.मंगळवारी पहाटे घडलेल्या या पाशवी घटनेने पुणे हादरले असून, राज्यभरातून संताप व्यक्त केला जात आहे. अवघ्या १०० फुटांवर पोलिस चौकी, परिसरात १८ सीसीटीव्ही, सुरक्षारक्षक असा सर्व बंदोबस्त असताना देखील नराधम दत्तात्रय रामदास गाडे (३६, रा. शिक्रापूर) या सराईत गुन्हेगाराने पीडितेच्या गैरफायदा घेत तिच्यावर दोनवेळा अत्याचार केला. या घटनेने राज्य हादरलं आहे. दरम्यान, या प्रकरणातील नराधम आरोपी अद्याप फरार असून त्याचा शोध घेतला जात आहे. तर गाडेला पकडून देणार्याला १ लाखांचं इनाम जाहीर करण्यात आले आहे.
दत्तात्रय रामदास गाडे (३६, रा. शिक्रापूर) या सराईत गुन्हेगार आहे, त्याच्यावरती आधी काही गुन्हे दाखल झालेले आहेत. तर दत्ता गाडेला पकडण्यासाठी पोलिसांनी एकूण १३ पथकं शोध घेत आहेत. तर या नराधम फरार आरोपी दत्ता गाडेला पकडून द्या, १ लाख मिळवा असं बक्षीस पुणे पोलिसांनी जाहीर केलं आहे. स्वारगेट प्रकरणातील आरोपीवर १ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आलं आहे. पुणे पोलिसांनी दत्ता गाडे याला पकडून देणार्याला बक्षीस जाहीर केल्याने त्याला पकडण्यात लवकर यश येण्याची शक्यता आहे. आरोपी दत्ता गाडे याच्यावर आत्तापर्यंत ७ गुन्हे दाखल आहते दत्ता गाडे सराईत गुन्हेगार असून, यापूर्वी त्याच्यावर जबरी चोरीचे दोन गुन्हे ग्रामीण पोलिसांत दाखल आहेत. त्याचा शोध घेण्यासाठी १३ पथके तैनात केली असून, त्याच्या भावाला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे, तसेच तरुणीवर ससून रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.