प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे : भरधाव रिक्षाने दिलेल्या धडकेत पादचारी ज्येष्ठ महिलेचा मृत्यू झाल्याची घटना पुणे-सोलापूर रस्त्यावरील द्राक्ष संशोधन केंद्रासमोर घडली आहे.याप्रकरणी रिक्षाचालकावर हडपसर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. लता किसन कारंडे (वय ४२, रा. कदमवाक वस्ती, लोणी काळभोर, सोलापूर रस्ता) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी रिक्षाचालकावर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत कारंडे यांचा मुलगा गौरव (वय २१, रा. भिगवण, ता. इंदापूर) याने हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, लता कारंडे १६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास पुणे-सोलापूर रस्त्यावरुन निघाल्या होत्या. हडपसर भागातील द्राक्ष संशोधन केंद्रासमोर रस्ता ओलांडणाऱ्या कारंडे यांना भरधाव रिक्षाने धडक दिली. अपघातात गंभीर जखमी झालेल्या कारंडे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. पसार झालेल्या रिक्षाचालकाचा शोध घेण्यात येत असून, पोलीस उपनिरीक्षक सत्यवान गेंड अधिक तपास करत आहेत .