प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे : भारतीय जीवन विमा निगम म्हणजेच (LIC) च्या नावाखाली देशभरातील नागरिकांना लाखोंचा गंडा घालण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेने पुण्यात खळबळ उडाली आहे. पुण्यामध्ये 'फ्रॉड कॉल सेंटर'वर छापेमारी करण्यात आली.या प्रकरणात तिघांना अटक करण्यात आली आहे.
पुण्यातील वेगवेगळ्या ठिकाणी बनावट कॉल सेंटर उभं करण्यात आले होते. कॉल सेंटरमधून नागरिकांना लुबडण्याचं काम सुरू होतं. फोन करून नागरिकांच्या एलआयसीची माहिती घेतली जायची. त्यांना विश्वासात घेऊन अधिक परताव्याचं आमिष देऊन एलआयसीचे पैसे आमच्या फर्ममध्ये गुंतवण्यास भाग पाडलं जायचं.
लाखोंचा गंडा घालणाऱ्या टोळीवर पोलिसांची झडप
एलआयसी पॉलीसीच्या नावाखाली देशभरातील नागरिकांना लाखोंचा गंडा घालणाऱ्या टोळीवर पोलिसांनी धाड टाकली आहे , शिवाजीनगर पोलिसांनी वाकडेवाडी येथील 'फ्रॉड कॉल सेंटर'वर छापेमारी करत तिघांना अटक केली आहे. शंकर कारकून पोखरकर, सिद्दिकी शेख आणि आशिष रामदास मानकर या तिघा आरोपींना अटक केली आहे.
कशी केली नागरिकांची फसवणूक..?
फ्रॉड कॉल सेंटर चालवणाऱ्या तिघा आरोपींची मोडस ओपरेंडी समोर आली आहे. या तिघांनी पुण्यातील वेगवेगळ्या ठिकाणी बनावट कॉल सेंटर उभं केलं होतं. या कॉल सेंटरमधून ते नागरिकांना फोन करायचे. नागरिकांच्या एलआयसीची माहिती घ्यायचे. मग त्यांना विश्वासात घेऊन एलआयसीचे पैसे आमच्या फर्ममध्ये गुंतवणूक करण्यास सांगयचे. अधिक परतावा देण्याचं आमिष दाखवलं जायचं. अशा प्रकारे त्यांनी नागरिकांची फसवणूक केल्याचं समोर आलं आहे.
अटक केलेल्या आरोपींकडून काही वस्तू हस्तगत करण्यात आल्या आहेत. फसवणुकीच्या या गुन्ह्यामध्ये ते या वस्तू वापरायचे. पुणे परिसरातील नामांकित ३५ कंपन्यांचे बनावट रबरी शिक्के, १५ मोबाईल, १५० सिम कार्ड आणि वेगवेगळ्या ३० बँकांची खाती, चेक बुक्स मिळाले आहेत. या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.
दरम्यान, या प्रकरणी पोलीसांनी नागरिकांना आवाहन केलं आहे. आरोपींनी एलआयसी कंपनीचे वर्किंग आयडी, एम्पलॉयी आयडी तयार केले होते. ३ आरोपींना अटक करण्यात आलं आहे. एलआयसीच्या नावाने कुणा नागरिकांची फसवणूक झाली असल्यास त्यांनी जवळच्या पोलीस स्थानकात किंवा शिवाजीनगर पोलीस स्थानकात तक्रार दाखल करावी असं आवाहन पोलीस उपयुक्त संदीप गिल यांनी केलं आहे.