प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे:- शिवसेना प्रभाग क्रमांक २९ मधे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांच्या आदेशाला साथ देत शहरप्रमुख संजय मोरे,व गजानन थरकुडे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसैनिकांनी उस्फुर्तपणे शिवसेना आंबील ओढा शाखेच्या वतीने सदस्य नोंदणी ला आजपासून सुरवात केली .
यावेळी बोलताना आयोजक प्रसिद्धी प्रमुख अनंत घरत म्हणाले शिवसेना , ठाकरे आणि मराठी माणूस हे एक समीकरण आहे, सामान्य माणसाला स्वतःच्या हक्काची वाटणारी अशी ही एकमेव संघटना आहे,
यावेळी सदस्य नोंदणीसाठी शिवसेना संघटक संतोष गोपाळ, किशोर राजपूत, विभाग प्रमुख नितीन परदेशी, गोविंद निंबाळकर, उपविभाग प्रमुख बाळासाहेब गरुड, तानाजी लोहकरे, विभाग समन्वयक प्रसाद चावरे, प्रभाग समन्वयक संजय साळवी, शाखाप्रमुख गणेश वायाळ, राहुल शिंदे, गणेश घोलप, रमेश लडकत, प्रणव आडकर, हृषिकेश गोगावले, अजय जोरी व शिवसैनिक उपस्थित होते.