अनियमित पाणीपुरवठ्या बद्दल शिवसेना कसबा आक्रमक

 


प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे:- कसब्यातील अनियमित पाणीपुरवठा नियोजना विरोधात कसबा मतदार संघांतील शिवसेनेना आक्रमक झाली असून प्रभाग क्रमांक १६ व १७ मधील कसबा पेठ, रविवार पेठ, बुधवार पेठ, गणेश पेठ भागात पुणे महानगरपालिकेच्या वतीने अनियमित पाणीपुरवठा करण्यात येत आहे, त्यामुळे नागरिक हैराण झाले असून अनेक नागरिकांनी कसबा शिवसेनेशी संपर्क साधला त्यानंतर शिवसेनेच्या वतीने कार्यकारी अभियंता सुनील यादव यांना निवेदन देण्यात आले. 

यावेळी संबंधित अधिकारी यांनी निवेदन स्विकारल्या नंतर तत्पर कारवाईचे आश्वासन दिले आहे,

कारवाई तत्पर होऊन नागरिकांच्या समस्या निवारण न झाल्यास शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल अशी तंबी यावेळी शिष्टमंडळाच्या वतीने देण्यात आली. 

यावेळी निवेदन देण्यासाठी कसबा मतदार संघाचे विभाग प्रमुख मुकुंद चव्हाण, युवासेनेचे चिंतामण मुंगी, महिला आघाडीच्या स्वाती कथलकर, अंगणवाडी सेनेच्या शहरप्रमुख गौरी चव्हाण, शिवसेना पदाधिकारी नागेश खडके, बकुळ डाखवे, अमोल घुमे, ईशान वीर व शिवसैनिक उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post