धक्कादायक घटना : स्वारगेट बस डेपोत 26 वर्षीय तरुणीवर बलात्कार ..

 

प्रेस मीडिया लाईव्ह : 

पुणे : शिवशाही बसमध्ये तरुणीवर अत्याचाराची धक्कादायक घटना समोर आली आहे. वर्दळीच्या स्वारगेट एसटी स्थानकावर पहाटे साडेपाच वाजता ही खळबळजनक घटना घडली. पोलिस आरोपीच्या मागावर आहेत.पीडित तरुणी फलटणला जाण्यासाठी स्वारगेटला आली होती. दत्तात्रय रामदास गाडे नावाच्या तरुणाने तिला फसवून अंधारात उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये बसवले यानंतर बसचा दरवाजा लावून तिच्यावर अत्याचार केला. 

आरोपीवर याआधीही गुन्हे दाखल असल्याची माहिती मिळत आहे. पोलीसांनी आरोपीचा शोध सुरु केला आहे . गजबजलेल्या स्वारगेट स्थानकावर असा धक्कादायक प्रकार समोर आल्याने महिला सुरक्षेबाबत प्रश्नचिह्न निर्माण झाले आहे.

नेमकं काय घडलं...?

मंगळवारी पहाटे साडेपाच वाजता पीडित तरुणी फलटणला जाण्यासाठी स्वारगेट बस स्थानकावर आली होती. फलटणला जाणारी बस कुठे लागते, याची तिला माहिती नसल्याने ती बसस्थानकावरील बाकड्यांवर बसली होती. यावेळी आरोपी गाडे त्या ठिकाणी आला, त्याने पीडितेकडं विचारपूस केली. यावेळी पीडितेनं आपल्याला फलटणला जायचं असल्याचं सांगितलं. यानंतर आरोपीनं स्वारगेट बसस्थानकावर दुसऱ्या बाजुला फलटणला जाणारी बस थांबते अशी खोटी माहिती दिली. पण तरुणीला संशय आल्याने तिने तिकडे जायला नकार दिला.

यावेळी आरोपी पीडितेला विश्वासात घेतलं आणि तो तिला आडबाजुला उभ्या असलेल्या एका शिवशाही बसजवळ घेऊन गेला. याठिकाणी आरोपीनं तिला बसमध्ये चढण्यास सांगितलं आणि तोही बसमध्ये चढला. यानंतर आरोपीनं बसमध्ये अतिप्रसंग केला आहे. याप्रकारानंतर पीडितेनं स्वारगेट पोलीस ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणी पोलिसांनी विविध कलमांतर्गत आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या आधारे पोलिसांनी आरोपीची ओळख पटवली आहे. फरार आरोपीचा शोध घेतला जातोय.

Post a Comment

Previous Post Next Post