बच्चे कंपनीचे विशेष आकर्षण
प्रेस मीडिया लाईव्ह :
अपल्या देशात सर्कसमध्ये प्राण्यांचा खेळ करण्यास तसेच प्राणी पाळण्यास बंदी आहे. बच्चे कंपनीला आवडणारे प्राणी आता आपल्या देशात कोणत्याच सर्कसमध्ये नाहीत. रॅम्बो सर्कस मधील वाघ, सिंह ,हत्ती, अस्वल, हिप्पोपोटोमस ,चिंपांझी, उंट, घोडे , असे सारे प्राणी सरकारकडे जमा झाले. त्यावेळेस रॅम्बो सर्कसचे मालक सुजित दिलीप यांनी केरळमधील कोईमतूर येथून ६ महिने खपून हुबेहूब डिजीटल हत्ती तयार केला. सुमारे ७-८ फूट उंचीचा हा ‘’डीजीटल हत्ती’’ चाकांवर ठेवला आहे . हत्तीच्या पाठीवर बसलेला सर्कस कलावंत तांत्रिकदृष्ट्या ऑपरेटिंग करतो व त्यानुसार हा डिजीटल हत्ती डावीकडे उजवीकडे मान वळून बघतो , व सोंड उंच करून पाण्यचा फवारा मारतो. तसेच हा डीजीटल हत्ती चीत्त्कारतो देखील ! या सोबतच कापडी चिंपांझी ,जिराफ आणि झेब्रादेखील सर्कसमध्ये आहेत.
येत्या काही महिनात मोठा कापडी चिंपांझी दुबईहून आणि उड्या मारणारा मोठा कापडी कांगारू ऑस्ट्रेलियामधून रॅम्बो सर्कसमध्ये देखील होईल. देशातील पहिले डीजीटल हत्ती सर्कसमध्ये पहिल्यांदा आणण्याचा मान रॅम्बो सर्कसला मिळाला याचा आनंद होतो.पुणेकरांनी देखील या डीजीटल हत्तीला मोठा प्रतिसाद दिला . असे सुजित दिलीप म्हणाले ,या प्रसंगी अक्षरकला मीडियाच्या तन्मयी मेहेंदळे यांनी “जिना यहा मरना यहा“हे गाणे गाऊन ‘रॅम्बो सर्कस’चा शुभारंभ केला.