खाली बसायचं!गजा मारणे पोलीस ठाण्यात हजर, पोलीसांनी भाईला बसवलं जमिनीवर पोलीसांनी त्याची जागा दाखवली!
प्रेस मीडिया लाईव्ह :
चंद्रशेखर पात्रे :
पुणे :- भाजपाचे नेते केंद्रीय नागरी उड्डाण राज्य मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यकर्त्याला मारहाण केल्याप्रकरणी गुंड गजा मारणेच्या अडचणीत वाढ झाली आहे.गजा मारणे हे स्वतः पोलीस ठाण्यात हजर झाल्यानंतर पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी अतिशय कडक भूमिका घेत भाईला जमीनीवर बसवून त्याची जागा दाखवून दिली याचा फोटो ही सोशल मीडिया वर सामाज माध्यमातून तुफान व्हायरल झाले आहे पोलिसांना शरण आल्यानंतर गजानन मारणेला आज पुण्यातील शिवाजीनगर कोर्टासमोर हजर करण्यात आले.
३ मार्च पर्यंत गजानन मारणेला पोलीस कोठडी कोर्टा कडून सुनावण्यात आली आहे.
कोर्टात काय घडलं..?
गजानन मारणेला पुण्यातील शिवाजीनगर कोर्टासमोर हजर करण्यात आला आहे. यावेळी मारणेच्या वकिलांनी जोरदार युक्तीवाद केला. यावेळी त्यांनी पोलिसांवर हल्लाबोल करत म्हणाले माझ्या अशिलाला खाली मांडी घालून बसवण्यात आले आणि ते फोटो व्हायरल करण्यात आले. हा पोलीसांचा अत्यंत बालिशपणा आहे. फरार आरोपी हजर होतं नाही म्हणून गजा मारणे यांना पकडण्यात आलं आहे. पोलिस हे दबावाखाली येऊन हे काम केलं आहे. या प्रकरणात ३०७ कलम कसं काय लागू होऊ शकतं? काल पर्यंतच्या रिमांड कॉपीमध्ये असा उल्लेख केला आहे की, ए त्या माणसाला मारा असं कुठेही नाहीये. नाकावर फ्रॅक्चर असल्यावर ३०७ कलम कसं लागू होऊ शकतं. या वातावरणात माझ्या असीलास कसं अडकवण्यात येईल याचा प्रयत्न केला आहे, असा युक्तीवाद मारणेच्या वकिलांनी केला आहे.
कोर्टाकडे मारणेच्या वकिलाची तक्रार
गजा मारणे चे वकिलांनी कोर्टात मी याबद्दल याचिकाही देखील दाखल करणार आहे. तोंडावर काळा कपडा बांधून नेण्यात येतं, खाली बसवून फोटो व्हायरल करण्यात येतो. पोलिसांकडे कुठलाही पुरावा नाही. गजा मारणे हा मधुमेहाचा रुगन आहे. पोलिसांनी फोटो व्हायरल केला, चेहऱ्याला न झाकता फोटो व्हायरल करण्यात आला आहे, अशी तक्रार गजा मारणेच्या वकिलांनी न्यायालया कडे केली आहे.
सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखाचे गणेश इंगळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, गजा मारणे विरोधात २८ गुन्हे दाखल आहेत. सखोल तपास करण्यासाठी पोलीस कोठडी असणं अत्यंत महत्वाची आहे. सीसीटीव्ही फुटेज आहे, त्याचाही सखोल तपास करायचा आहे असही इंगळे यावेळी म्हणाले.
"गजा मारणे वर आतापर्यंत किती गुन्हे दाखल".
गजा मारणे यांचा विरोधात खुन खुनाचा प्रयत्न खंडणी असे तब्बल २८ गुन्हे दाखल आहेत, पुणे पोलीसांनकडुंन २०१४ पासून चारवेळा मकोका तर अमोल शिंदे पप्पू गावडे खुन प्रकरणात दोनदा मकोका तर वकिला कडुन खंडणी मागणी प्रकरणात २०२२ साली मकोका असे गुन्हे दाखल आहेत.