शहरासह उपनगरातील रस्त्यावर भिक मागणाऱ्या भिकारी, तृतीयपंथी , पोतराजांसह बहुरुपींकडून नागरिकांना त्रास: आम आदमी पक्षाची तातडीने प्रतिबंध करण्याची मागणी




प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे :  उपनगरांसह शहरातील रस्त्यांवर भिक मागणाऱ्या भिकारी, लहान मुले, पोतराज, तृतीय पंथीय, बहुरुप्यांसह वयोवृद्धांकडून होणाऱ्या छळामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत .रस्त्यावर भिक मागणाऱ्यांना प्रतिबंधक करण्यात यावा अशी मागणी पुणे शहर आम आदमी पक्षाचे शहराध्यक्ष धनंजय बेनकर यांनी केली आहे.

भिक मागण्यांस व देण्यास कायद्याने मनाई असतानाही त्याची अंमलबजावणी केली जात नाही याकडे आम आदमी पक्षाचे शहराध्यक्ष धनंजय बेनकर यांनी पुणे शहर पोलिस आयुक्तांचे लक्ष वेधले आहे.  या बाबत आम आदमी पक्षाचे शहराध्यक्ष धनंजय बेनकर यांनी पोलिस आयुक्तांना निवेदन दिले आहे.

धनंजय बेनकर म्हणाले‌, अलीकडच्या आठ दहा वर्षात हजारो भिकारी, तृतीय पंथी तसेच बहुरुपी, पोतराज, लहान मुले रस्त्यावर उभी राहत आहेत रस्त्यांसह सार्वजनिक ठिकाणी भिक मागण्यांस मुंबई अधिनियम १९५९ कायद्यानुसार प्रतिबंधक करण्यात आला आहे तसेच भिक मागणाऱ्यांसाठी पुनर्वसन केंद्रेही शहरासह राज्यात सुरु करण्यात आली आहे. असे असले तरी रस्त्यांवर भिक मागणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे.

शहर व उपनगरातील पुणे चौका चौकात सिग्नल जवळ भिक मागणारी लहान मुले,तृतीय पंथीय , महिला,बहुरुप्यांसह वयोवृद्द अचानक जमा होतात. वाहनांच्या समोर आडवे उभे राहून पैसे मागतात कार, वाहनांचे दरवाजे न उघडल्यास जोरा जोरात वाहनांच्या काचांना बुक्का मारतात. भिक मागणारे गाड्यांसमोर उभे राहिल्याने वाहतुक ठप्प पडते. वाहतुकीला अडथळा निर्माण करून ते थेट वाहनचालकांच्या अंगाला हात लावणे , त्रास देणे. भिक दिली नाही तर वाईट होण्याचा शाप देणे, गाडीच्या काचांवर ओरखडे काढणे , भिक मागण्यासाठी लहान मुले गाडी समोरून धावा धाव करताना ती  वाहनचालकास दिसतही नाही त्यामुळे वाहनाखाली चिरडून लहान मुलांचा मृत्यू होण्याची शक्यता आहे.

बेनकर म्हणाले‌, जबरदस्तीने भिक मागणाऱ्यांचे मोठे रॅकेट शहरात आहे .रस्त्यावर, चौका चौकात उभे राहून बळजबरीने भिक मागणाऱ्यांमुळे  नागरिकांना मानसिक व शारीरिक छळ केला जात आहे .

पुण्यात येणाऱ्या देशी विदेशी पर्यटक अशा प्रकारांमुळे त्रस्त झाले आहे. त्यामुळे पुण्याची प्रतिमा मलिन झाली आहे. इतर राज्यांमध्ये भीक देणे - मागणे कायदेशीर गुन्हा आहे‌ . तसेच त्याची अंमलबजावणीही सुरू आहे मात्र परंतु आपल्या पुणे शहरामध्ये तशी अंमलबजावणी होताना दिसत नाही तरी मुंबइचा भीक मागण्यास प्रतिबंध करण्याबाबत अधिनियम १९५९ ची अंमलबजावणी व्हावी व भीक देणे –मागणे यांच्यावर कठोर निर्बंध घालण्यात यावेत.

भिक मागण्यांस प्रतिबंध करण्यासाठी  तात्काळ कठोर पावले उचलावीत..सिग्नलवरील या प्रकारांवर नियमित पेट्रोलिंग करावे. सिग्नलवरील भिकारी, तृतीयपंथी, पोतराज आदींना हटवण्यासाठी  उपाययोजना कराव्या.तसेच त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी.

Post a Comment

Previous Post Next Post