पिंपरी येथील राजीव गांधी माध्यमिक विद्यालयात ४१ वर्षांनी पुन्हा भरला दहावीचा वर्ग

 

प्रेस मीडिया लाईव्ह :

पिंपरी, पुणे (दि. १३ फेब्रुवारी २०२५) पिंपरी चिंचवड महापालिकेचे राजीव गांधी माध्यमिक विद्यालय नेहरूनगर येथे सन १९८३ व १९८४ मध्ये इयत्ता दहावी बॅच चे विद्यार्थी - विद्यार्थीनी आणि शिक्षक यांचा स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला होता. ४१ वर्षांनी शाळेच्या प्रांगणात  मोठ्या उत्साहात पुन्हा दहावीचा वर्ग भरविण्यात आला होता. यावेळी ९० पेक्षा जास्त माजी विद्यार्थी-विद्यार्थीनी उपस्थित होते. यासाठी मागील आठ महिन्यांपासून हॉट्सअपच्या माध्यमातून सर्व वर्ग मित्र व वर्ग मैत्रिणी संपर्क संपर्कात येऊन स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका नलिनी जाधव होत्या. तसेच गोकुळ गायकवाड यांनी कार्यक्रमाचे प्रास्तविक केले.

माजी शिक्षकांपैकी सुलभा साळवी मॅडम, हरिश्चंद्र मचाले सर, नारायण थिटे सर, गोविंद चितोडकर सर, रामदास शिंगाडे सर, पार्वती भोसले आणि टिपरे मॅडम या सर्व माजी शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. माजी शिक्षकांनी जुन्या आठवणींना उजाळा देऊन आपले अनुभव सांगितले. अनेक विद्यार्थी प्रशासन सेवेत उच्च पदावर कार्यरत आहेत, काही उद्योजक बनले आहेत तर काही स्वतःच्या शिक्षण संस्था मध्ये व सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत. काही माजी विद्यार्थी व विद्यार्थीनी यांनी आपली मनोगते व्यक्त केली. 

राम मेमाणे, सुभाष ढेरे, मनोज ढेरंगे व अभिनेते काळूराम ढोबळे यांनी जुन्या मराठी व हिंदी गाणी गाऊन आपली कला सादर केली व कार्यक्रमात रंगत आणली.

कार्यक्रमाच्या आयोजनात नियोजन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे कामगार नेते नितीन समगीर, गोकुळ गायकवाड, संजय चव्हाण, रोहिदास गव्हाणे, संजय काळभोर, मुबारक पानसरे, दिलीप शिंदे, नंदा ढेरे, आशा साळवी यांनी सहभाग घेतला. सूत्रसंचालन विद्यालयातील शिक्षिका वैशाली शेलार व वर्षा हडपसरकर यांनी तर आभार नितीन समगिर यांनी मानले.

Post a Comment

Previous Post Next Post