पन्नास राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपनीत मिळणार काम पाच हजार नोकरीची संधी.
प्रेस मीडिया लाईव्ह :
चंद्रशेखर पात्रे :
पिंपरी :- मावळ लोकसभेचे खासदार संसद रत्न श्रीरंग आप्पा बारणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून अनेक बेरोजगार मुला मुलींना नोकरीचे साधन उपलब्ध करून देण्यात येत आहे पाचवी ते पदवीधर लोकांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे वाढदिवसानिमित्त युवासेनेच्या वतीने थेरगाव येथे भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार, दि.१५ फेब्रुवारी २०२५ रोजी, सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत मोरया बँक्वेट हाॅल, दत्तनगर, थेरगाव येथे हा मेळावा आयोजित होणार असल्याची माहिती पश्चिम महाराष्ट्राचे युवासेना सचिव विश्वजीत बारणे यांनी दिली आहे.
विश्वजीत बारणे यांनी म्हटले आहे की, देशाचे उज्ज्वल भविष्य हे आजच्या तरुणांच्या हातात आहे. त्यांना देशाच्या प्रगतीत योगदान देण्यासाठी रोजगाराची संधी उपलब्ध करून देणं अत्यंत महत्त्वाचं आहे. याच दृष्टिकोनातून व मावळ लोकसभेचे खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत युवासेनेच्या वतीने हा भव्य रोजगार मेळावा आयोजित करण्यात येत आहे.या रोजगार मेळाव्यात महाराष्ट्रातील ५० राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय नामांकित कंपन्यांचा सहभाग असणार आहे. यावेळी ५ हजाराहून अधिक तरुण-तरुणींना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. या मेळाव्यात पाचवी ते पदवीधर पर्यंतचे शिक्षण असणाऱ्यांना तरुणांना सहभागी होता येणार आहे. त्याचप्रमाणे यावेळी निवड झालेल्या उमेदवारांना तात्काळ नियुक्तीपत्र देण्यात येणार आहे. तरी मावळ लोकसभा मतदारसंघातील सर्व सुशिक्षित तरुण तरुणींनी या रोजगार मेळाव्यात सहभागी होऊन सुवर्णसंधीचा लाभ घेत आपल्या उज्ज्वल भविष्याची सुरुवात करावी असे आवाहन विश्वजीत बारणे यांनी केले आहे.