त्यागमूर्ती माता रमाई भिमराव आंबेडकर जागेच्या भूमिपूजनाचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवावा अन्यथा ह बेमुदत धरणे आंदोलन तीव्र करण्यात येईल


प्रेस मीडिया लाईव्ह :

 प्रतिनिधी: अमर धांडे 

पिंपरी :   वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पिंपरी चिंचवड शहर सचिव राजेंद्र साळवे आणि सहकारी यांच्या नेतृत्वात 16 जानेवारीपासून 2025 त्याग मूर्ती माता रमाई भीमराव आंबेडकर यांच्या स्मारकाचे भूमिपूजन व्हावे यासाठी बेमुदत धरणे आंदोलने सुरू असून आज त्याचा 30 दिवस आहे .

पण आपण प्रत्येक वेळी दिरंगाई करत आमच्या शिष्टमंडळाला आपण फक्त आश्वासन देत आले आहात पी एम पी एल ने आपणास 5 फेब्रुवारीला 2025 ना हरकत पत्र पाठवले असून आपण 11 फेब्रुवारी 2025 रोजी झालेल्या जनरल बॉडी मध्ये आपण त्याग मूर्ती माता रमाई स्मारकाच्या जागेचा प्रस्ताव विषय पत्रिकेत घेतला नसून ही दप्तर दिरंगाई समाजाच्या भावना दुखावणारे आहेत आपण तात्काळ पुढील येणाऱ्या जनरल बॉडी मध्ये हा प्रस्ताव घेऊन राज्य शासनाकडे पाठवावा अन्यथा हे बेमुदत धरणे आंदोलन अजून तीव्र करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे. 

यावेळी आयुक्तांना निवेदन देताना वंचित बहुजन आघाडीचे शहर सचिव राजेंद्र साळवे वंचित बहुजन आघाडी जनरल माथाडी ट्रान्सपोर्ट कामगार युनियन पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष संजय ठोंबे माजी उपाध्यक्ष संतोष जोगदंड उपाध्यक्ष दीपक भालेराव पॅंथर दत्ताभाऊ गायकवाड, बापूसाहेब गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर, सचिव जितेंद्र मोटे, संघटक विष्णू सरपते, शिवाजी खडसे, अनिल गायकवाड, बाबासाहेब वाघमारे,दत्ताभाऊ कांबळे, आदी मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post