प्रेस मीडिया लाईव्ह :
पिंपरी, पुणे (दि. ६ फेब्रुवारी २०२५) व्यवस्थापन शाखेतील विद्यार्थ्यांना औद्योगिक क्षेत्राची ओळख आणि अनुभव मिळवून देण्यासाठी बेंगलोर येथील इसरो, आयआयएम, हिंदुस्तान ॲरोनॉटिकल लिमिटेड, ट्रीनीटी एडीटी, कोल्हापूर येथील छत्रपती शाहू महाराज सहकारी साखर कारखाना, कागल येथील आदित्य बिर्ला यांचा ग्रासीम उद्योग या विविध उद्योग समूहांना पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या आकुर्डी येथील एस. बी. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटच्या (एसबीपीआयएम) विद्यार्थ्यांनी भेट दिली.
संचालिका डॉ. कीर्ती धारवाडकर यांच्या मार्गदर्शनानुसार सहयोगी प्रा.डॉ. योगेंद्र देवकर, डॉ. दिलीप पवार, अनघा कुलकर्णी यांनी समन्वयक म्हणून काम केले. या उद्योग भेटीत विद्यार्थ्यांना उद्योगांमधल्या विविध प्रक्रिया, त्यांच्या कार्यप्रणाली यांचा अभ्यास करण्याची संधी मिळाली. नवीन शिक्षण धोरण २०२० अनुसार प्रात्यक्षिक शिक्षण घेण्याचा अनुभव प्राप्त झाला.
पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त तथा पीसीयुचे कुलपती हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.