प्रेस मीडिया लाईव्ह :
श्री बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळ अंबप संचलित, "कॉलेज ऑफ एज्युकेशन "(बी.एड्.)पेठ वडगाव येथे सोमवार, दिनांक 17 फेब्रुवारी 2025 रोजी ,"शाळा व नाविन्यपूर्ण अध्ययन -अध्यापन केंद्रांना भेटी " या प्रात्यक्षिकांतर्गत माननीय प्राचार्या डॉ.आर.एल. निर्मळे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली "वारणा सायन्स अँड इनोव्हेशन ऍक्टिव्हिटी सेंटर , वारणानगर" या ठिकाणी भेट देण्यात आली.
त्यामध्ये इनोव्हेशन ऍक्टिव्हिटी, लॅबोरेटरी, प्रदर्शन व मंगळयान संदर्भातील चित्रलेखीय प्रदर्शन, खेळातून वैज्ञानिक संकल्पना समजून घेण्याचा अनुभव, सायन्स पार्क तसेच ब्रम्हांड, आकाशगंगा, तारे ,तारका समूह, राशी- नक्षत्र इत्यादींची शास्त्रीय माहिती "कालक्रमानुसार पृथ्वी पर्यंतचा प्रवास" या चित्रफितीच्या माध्यमातून मिळविली. या प्रात्यक्षिकासाठी सायन्स सेंटर मधील लोले सर व त्यांच्या सहकाऱ्यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. सरांचे आभार द्वितीय वर्षातील वर्षातील छात्राध्यापिका शर्वरी करपे हिने मानले. या भेटीस प्राध्यापिका शिरतोडे मॅडम, प्राध्यापिका सावंत मॅडम, व बी.एड्. द्वितीय वर्षातील छात्राध्यापक व छात्राध्यापिका उपस्थित होते.