प्रेस मीडिया लाईव्ह :
श्री बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळ अंबप संचलित कॉलेज ऑफ एज्युकेशन बी.एड्. पेठ वडगाव येथे बी.एड्. प्रथम वर्ष अंतर्गत आंतरवासिता टप्पा क्रमांक-१ या प्रात्यक्षिकांतर्गत आंतरवासिता उत्तर आठवडा या कालावधीमध्ये अहवाल वाचन व सादरीकरण घेण्यात आले.
आंतरवासिता टप्पा क्रमांक एक अंतर्गत विद्यार्थ्यांचे दोन गट करण्यात आले होते .गट क्रमांक एक यांनी श्रीमती इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालय व ज्युनिअर कॉलेज पेठ वडगाव येथे आंतरवासिता पूर्ण केली. गट क्रमांक दोन या गटाची आंतरवासिता जे.के. माळवे प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा, पेठ वडगाव येथे पार पडली.
या आंतरवासितेमध्ये २७ जानेवारी ते ३ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत छात्राध्यापकांनी अध्ययन-अध्यापनाबरोबरच शाळेमध्ये वेगवेगळे उपक्रम राबवले. यामध्ये विविध स्पर्धा व ऍक्टिव्हिटी राबविण्यात आल्या. आंतरवासितेदरम्यान आलेल्या सर्व अनुभवांचे कथन व सादरीकरण शनिवार दिं. १५ फेब्रुवारी, २०२५ रोजी घेण्यात आले.या सादरीकरणादरम्यान विद्यार्थ्यांनी आपल्याला आंतरवासितेमध्ये आलेले सर्व प्रत्यक्ष अनुभवांचे कथन केले व आंतरवासिता कालावधीमधील आपल्या अनुभवांची देवाणघेवाण केली. या सादरीकरणादरम्यान महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.निर्मळे आर.एल., सर्व प्राध्यापक वर्ग ,शिक्षकेतर कर्मचारी व सर्व छात्राध्यापक उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी गटवार व वैयक्तिक अहवाल सादरीकरण केले. सादरीकरण करत असताना विद्यार्थ्यांनी इंटरनेट व माध्यमांचा वापर करून प्रेझेंटेशन द्वारे आंतरवासिता अनुभव कथन केले.सर्व छात्राध्यापकांच्या अनुभव कथन व सादरीकरणानंतर महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी विद्यार्थ्यांना भविष्यकाळात उत्तम शिक्षक कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या व सुयोग्य मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिजीत सावंत या छात्राध्यापकाने केले व कार्यक्रमासाठी उपस्थित सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.