पेठ वडगाव येथे आंतरवासिता कार्येक्रम संपन्न


प्रेस मीडिया लाईव्ह :

श्री.बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळ अंबप संचलित,कॉलेज ऑफ एज्युकेशन (बी.एड्.) पेठ वडगाव येथे बी.एड्. प्रथम वर्षातील सेमिस्टर दोन मधील शालेय आंतरवासिता टप्पा क्रमांक एक,शालेय आंतरवासिता प्रात्यक्षिकांतर्गत, आंतरवासिता गट क्रमांक दोन - जे.के.माळवे प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा, पेठ वडगाव येथे आंतरवासिता  कार्येक्रम संपन्न झाला

 ही आंतरवासिता दिनांक 27/01/2025 पासून सुरू करण्यात आली होती. या आंतरवासिते दरम्यान छात्राध्यापकांनी अध्ययनाबरोबरच वेगवेगळे उपक्रम राबविले.त्यामध्ये निबंध स्पर्धा , हस्ताक्षर स्पर्धा,रंगभरण स्पर्धा,वक्तृत्व स्पर्धा,मेहंदी स्पर्धा तसेच वेगवेगळे उपक्रम देखील राबवण्यात आले त्यामध्ये लाठी-काठी प्रशिक्षण,एरोबिक्स ,अक्षरलेखन, वेदिक मॅथ्स ट्रिक, ब्रेन फोकस गेम्स, क्ले आर्ट, कवायत प्रकार,तसेच ग्रीन क्लब ऍक्टिव्हिटी मध्ये वृक्षारोपण,रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रेझेंटेशन, टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू तयार करणे, परिसर स्वच्छता असे वेगवेगळे उपक्रम राबवण्यात आले.

शनिवार,दिनांक 01/02/2025 रोजी आंतरवासितेचा सांगता समारंभ संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आश्रम शाळेचे मुख्याध्यापक माननीय श्री.जे.बी.पाटील सर उपस्थित होते तसेच कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थितीमध्ये महाविद्यालयाच्या प्र.प्राचार्या डॉ.सौ.निर्मळे- चौगुले आर.एल.मॅडम उपस्थित होत्या. तसेच जे.के.माळवे शाळेचे अधीक्षक परशुराम पाटील सर ,जयसिंगपूर माध्यमिक आश्रम शाळेचे मुख्याध्यापक खताळ सर उपस्थित होते .तसेच आश्रमशाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

या गटाचे शालेय आंतरवासिता प्रात्यक्षिक प्रा.सौ.सावंत ए.पी.,प्रा.डॉ.सौ.पवार ए.आर., प्रा चांडवले एस.एस.यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन छात्रपर्यवेक्षिका प्रगती चौगुले यांनी केले. आंतरवासितेदरम्यान घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचे मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. शाळेतील विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.तसेच छात्रमुख्याध्यापक खोत सुजित ,छात्र उपमुख्याध्यापिका माधुरी जाधव व छात्राध्यापिका डवरी शुभांगी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्याचबरोबर आश्रम शाळेतील शिक्षिका सौ.छाया पाटील मॅडम यांनी आपले मनोगत व्यक्त केले,त्यावेळी त्यांनी छात्राध्यापकांचे भरभरून कौतुक केले. 

महाविद्यालयाच्या प्राचार्या निर्मळे मॅडम यांनीही विद्यार्थ्यांना खूप मोलाचे मार्गदर्शन केले.त्यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांनी आपला आत्मविश्वास वाढविला पाहिजे ,नवीन गोष्टी शिकण्यावर भर दिला पाहिजे ,तसेच आश्रमशाळा महाविद्यालयाला आंतरवासितेसाठी दिल्याबद्दल महाविद्यालयातर्फे मुख्याध्यापकांचे आभार मानले, तसेच शाळेचे मुख्याध्यापक श्री.जे.बी.पाटील सर यांनी छात्राध्यापकांच्या कामाचे कौतुक करत त्यांना शुभेच्छा दिल्या, त्यानंतर आंतर वासितेमध्ये राबविलेल्या लाठीकाठी उपक्रमाचे सादरीकरण करण्यात आले.अगदी उत्तमरीत्या विद्यार्थ्यांनी लाठी काठी सादरीकरण केले आणि कार्यक्रमाच्या शेवटी छात्राध्यापिका पूनम राणे यांनी आभार मानले, अशाप्रकारे ही आंतरवासिता टप्पा क्रमांक एक अगदी व्यवस्थितरित्या पार पडली.

Post a Comment

Previous Post Next Post