प्रेस मीडिया लाईव्ह :
विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केल्यामुळे राज्याच्या राजकारणात जोरदार चर्चा सुरू असतानाच आता डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या माजी ओएसडीसह तिघांविरोधात रत्नागिरीतील तरुणाची फसवणूक केल्याप्रकरणी पोलिसांनी तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे .
आरोग्य खात्यात नोकरी देण्याच्या बहाण्याने रत्नागिरी जिल्ह्यातील तरुणाकडून जवळपास 6.50 लाख रुपये उकळण्यात आल्याच आरोप आहे. शनिवारी माहीम पोलिसांनी गुन्हा नोंदवला. सचिन चिखलीकर, चारुदत्त तांबे, तेजस तांबे अशी आरोपींची नावे आहेत. त्यापैकी सचिन मंत्रालयात ओएसडी म्हणून नियुक्त होता, तर फसवणूक झालेला तरुण निवृत्त पोलिसाचा मुलगा आहे.
.