प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर- कोल्हापूर सर्जिकल सोसायटी यांच्या वतीने "MASICON 2025" ही चार दिवसांची 47 वी.वैद्यकीय परिषद गुरुवार दि.06/01/2025 ते 09/01/2025 या कालावधीत हॉटेल सयाजी येथे होणार आहे. ही परिषद असोसिएशन ऑफ सर्जन ऑफ इंडिया, महाराष्ट्र राज्य यांच्या मार्फत MASICON शल्यविशारद यांच्या वतीने प्रत्येक वर्षी भरवली जाते. या वर्षी हा मान कोल्हापूर सर्जिकल सोसायटी ने MASICON ही परिषद आयोजित करण्याचा बहुमान मिळविला आहे.
कोल्हापूर सर्जिकल सोसायटीला ८ वेळा महाराष्ट्र राज्य आणि २ वेळा देशपातळीवर Best Society म्हणून बहुमान मिळाला आहे.
दिनांक ६ फेब्रुवारी रोजी निरंतर अभ्यास (CME) सकाळी ९ ते ५ या वेळेत होणार आहे. या दिवशी विविध विषया वरील उदा. थायरॉईड, मधुमेह, मुतखडा व बवनवीन शोथ या विषयावर सर्जन बोलणार आहेत. त्यामध्ये डॉ. मिलीद रुके मधुमेह, थायरॉईड वर डॉ. निता बायर, तसेच नवनवीन विषय स्वर इतर सर्जन बोलणार आहेत. त्याचे दिवशी १२ वाजता बिरंतर अभ्यास (CME) चे उद्घाटन होणार आहे. उद्द्घाटन महाराष्ट्र राज्य परिषदेचे अध्यक्ष डॉ. अजय पुणपाळे व डॉ. डी. वाय. पाटीलचे कुलगुरू, डीन आणि आर.सी.एस.एम. चे डीन याच्या उपस्थितीत होणार आहे.
दिनांक ७ फेब्रुवारी रोजी विविध प्रकारच्या शस्त्रक्रिया दाखवून त्यातील नवनवीन पध्दती सांगण्यात येणार आहेत. हयासाठी अतराष्ट्रीय स्थरावरचे डॉ. मायदेव तसेच अंतरंग हॉस्पिटलचे डॉ. विवेकानंद कुलकर्णी इहोस्कोपीक सर्जरी, दुर्बिणीव्दारे हर्णिया, जठराच्या, पित्ताशयाच्या व स्थूलपना वरच्या शस्त्रक्रिया दाखवण्यात येतील त्याच बरोबर भगेंद्र, मुळव्याध हया शस्त्रक्रिया देखील दाखवण्यात येणार आहेत. यासाठी डॉ. रॉय पाटणकर झेन हॉस्पिटल, मुबई, डॉ. पल्लीवेणु, जैम हॉस्पिटल कोईबतूर, हैद्राबाद वरून डॉ. इस्माईल, कोल्हापूर कॅन्सर सेंटर वरुन डॉ. सुरज पवार हे रॉबोटीक सर्जरीचे प्रात्यक्षिक तसेच कोल्हापूर सर्जिकल सोसायटीचे सदस्य विविध शस्त्रक्रिया दाखवणार आहेत.
या परिषदेचे उद्घाटन असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष डॉ. प्रविण सुर्यवंशी याच्या हस्ते व डॉ. संतोष अब्राहम, डॉ. सजय पाटील कुलपती डॉ. डी. वाय. पाटील तसेच महाराष्ट्र राज्य शल्यचिकित्सक सोसायटीचे अध्यक्ष डॉ. अजय पुणपाळे, सचिव डॉ. सचिन नाईक यांच्या उपस्थितीत होणार आहे.
दिनांक ८ फेब्रुवारी रोजी विविध विषया वरती चर्चासत्र आयोजित केली आहेत. यामध्ये प्रामुख्याने डॉ. प्रविण सुर्यवशी डॉ. सिध्देश, मैसूर, डॉ. भवरलाल यादव, जयपुर डॉ. अभय दळवी यांचे चर्चासत्र त्याच दिवशी विविध विषया वरील चर्चासत्रे जसे की अन्बबलिकेचा कॅन्सर या विषयी डॉ. श्रीजेयन, केरळ, डॉ. राजनगरकर बाशीक वरून सहभाग घेणार आहेत. रक्तवाहीणीच्या आजारावर डॉ. कामेरकर, हर्णिया विषयी डॉ. राहूल मंदार मार्गदर्शन करणार आहेत. तसेच स्तानचे कॅन्सर व Accidental Trauma, मुळव्याध, भगेद्र या विषयी मार्गदर्शन करणार आहेत. त्याच दिवशी मावाचे जी.एम. फडतारे ऑरेशन डॉ. सतिश धारप देणार आहेत.
दिनांक ९ फेब्रुवारी रोजी विविध विषयावरील व्याख्याने होणार आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने डॉ. पार्थसारथी, डॉ. रेघे, डॉ. पोरवाल डॉ. पल्लीवेलू हे सहभागी होणार आहेत तसेच विविध ऑपरेशनचे व्हिडीओ दाखवण्यात येणार आहेत. दिनांक ९ फेब्रुवारी दुपारी ११ वाजता दुसरे मानाचे डॉ. घारपुरे ओरेशन, कोल्हापूरचे कॅन्सर सर्जन डॉ. सुरज पवार देणार आहेत. यानतर विविध विषयावरील बेस्ट पेपर पी.जी. डॉक्टर्स प्रस्तुत करणार आहेत.त्यानंतर परिषदेची सांगता होईल.
या परिषदेसाठी परिषदेचे अध्यक्ष डॉ. दिपक पाटील, परिषदेचे सचिव डॉ. आनंद कामत, परिषदेचे संयोजक डॉ. प्रताप वरूटे, सह सचिव डॉ. बसवराज कदलगे, डॉ. कौस्तुभ कुलकर्णी, डॉ. सौरभ गांधी, डॉ. मानसिंग अडवाईक, खजानिस डॉ. मधूर जोशी, डॉ. सागर कुरूणकर, व सर्व आयोजन समिती सदस्य उपस्थित होते.