प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर- करवीर तालुक्यातील मासवडे येथील श्रेयस बाळू जाधव (वय 22) यांने शनिवार (दि.01) रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या आवारात कोणतेतरी विषारी औषध घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.त्याला उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले.या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे.
श्रेयस हा मासवडे येथे आपल्या कुंटुबिया समवेत रहात असून त्याचे त्याच गावातील शेजारी रहात असलेल्या मुली बरोबर प्रेम संबंध आहे.या कारणातुन दोन्ही कुंटुबियात वाद होऊन मारहाणीचीचे प्रकार घडत असत.मुलीच्या घरच्याच्या कडुन वारंवार मारहाण त्या तरुणास होत होती.आज परत मुलीच्या घरच्यांनी श्रेयसला मारहाण केल्याने त्याने पोलिस अधीक्षक कार्यालयात निवेदन देण्या साठी गेला होता.निवेदन देऊन कार्यालयाच्या बाहेर येऊन त्याने जवळ असलेली विषारी औषधांची बाटली घेऊन प्यायल्याने त्याच्या नातेवाईकांनी आरडा ओरडा केल्याने हा प्रकार निदर्शनास आला त्याला तातडीने सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले .या घटनेने पोलिस अधीक्षक कार्यालयात मोठी खळबळ उडाली.या घटनेचे गांभीर्य ओळखून करवीर पोलिस ठाण्याच्या अधिकारी यांनी सीपीआर रुग्णालयात येऊन माहिती घेतली.