गर्भलिंग निदान' महिला डॉक्टरसह तिघींना चार दिवसांची पोलीस कोठडी.

 सोनोग्राफी मशीन चालकाचा शोध चालू.

प्रेस मीडिया लाईव्ह :

मुरलीधर कांबळे :

कोल्हापूर  - कोल्हापुरात दोन ठिकाणी  बेकायदेशीर गर्भलिंग निदान आणि  गर्भपाताचा प्रयत्न तसेच गोळ्या देणे या प्रकरणी आरोग्य विभागाने बुधवारी कळंबा येथील श्रध्दा दवाखाना व वरणगे पाडळी येथील घरात छापा टाकून डॉ. महिलेसह तिघींना बुधवारी अटक करून  त्यांच्यावर करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.पोलिसांनी अटक केलेल्या तिघींना गुरुवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने चार  दिवसांची पोलीस कोेठडी सुनावली आहे.

 कळंबा येथील साई मंदिर समोरील श्रद्धा दवाखान्याच्या डॉ. दीपाली सुभाष ताईगडे (वय ४६, रा. साई मंदिरसमोर, कळंबा) हिला अटक केली. तिच्यावर बेकायदा गर्भलिंग निदान व गर्भपाताचा प्रयत्न करणे या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. या गुन्हयात गर्भलिंन निदान करण्यासाठी सोनोग्राफी मशीन  वापर करणारा सुयश सुनिल हुक्केरी याच्यावरही गुन्हा दाखल झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.  तर वरणगे पाडळी येथे सापळा रचून गर्भपाताच्या गोळ्या घरी जाऊन देणाऱ्या  सुप्रिया संतोष माने (वय ४२, रा. रायगड कॉलनी, कळंबा), धनश्री अरुण भोसले (वय ३० रा. शिंगणापूर) या दोघींना अटक केली. त्यांच्यावर कोणतेही अवैध वैद्यकीय व्यवसाय सुरू करून शासनाची व रुग्णांची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

 श्रध्दा दवाखान्यात आलेल्या गर्भवतीची गर्भलिंग निदान आणि  गर्भपात करण्यासाठी ३० हजार रुपये घेऊन केले जात होते. बुधवारी दुपारी या दवाखान्या सुयश हुक्केरी याने गर्भवतीची तपासणी करण्यासाठी आल्यानंतर त्याला डमी गर्भवती असल्याचा संशय आल्यानंतर तो तेथून सोनोग्राफी मशिन घेऊन पळून गेला. त्यानंतर पोलीस व आरोग्य विभागाने छापा टाकून १ लाख ४३ हजार रुपयांची रोकड, गर्भपाताच्या गोळ्या,मोबाईल व इतर साहित्य असा १ लाख ५७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.                                  

 तर वरणगे पाडळी गर्भपाताच्या गोळ्या विक्री करण्यासाठी गेलेल्या  दोन महिलांना अटक करून त्यांच्याकडून रोख रक्कम ६ हजार, मोबाईल, गर्भपाताच्या गोळ्या असा १७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. दोन्ही गुन्हयातील तिघींना गुरुवारी न्यायालयात हजर केले असता त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे.

  सोनोग्राफी मशिनवाला नॉट रिचेबल.

 श्रध्दा दवाखान्यात आलेल्या गर्भवतीची तपासणी करणारा सोनोग्राफी मशिनचा चालक व मालक सुयश हुक्केरी हा बुधवारी रात्रीपासूनच बेपत्ता झाला आहे. त्याचा माोबाईल बंद आहे. घरचा पत्ता नसल्याने पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत. तो सापडल्यानंतर त्याने आजपर्यत किती गर्भलिंग निदान केले. इतर किती डॉक्टर त्याच्या संपर्कात होते ही माहिती पुढ़ील तपासात निष्पन्न होणार आहे.

Post a Comment

Previous Post Next Post