प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर- मोटारसायकल वरुन बाजार घेऊन घरी येत असताना मोटारसायकल स्लिप होऊन पडल्याने शमशादबी नय्युम मुजावर (वय 43.रा.आंबेडकर नगर सांगली रोड,इंचलकरंजी) त्यांना उपचारासाठी इंचलकरंजी येथील आयजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.तेथे उपचार घेऊन पुढ़ील उपचारासाठी गुरुवार (दि.06) रोजी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले असता त्यांचा उपचारापूर्वी मृत्यु झाला.या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे.
यातील मयत या आपल्या मुलासोबत बुधवार (दि.05) रोजी रात्री नऊच्या सुमारास मोटारसायकल वरुन बाजारात गेल्या होत्या.बाजार घेऊन घरी जात असताना मोटारसायकल स्लिप झाल्याने त्या खाली पडल्याने जखमी झाल्या होत्या.त्यांच्या पश्च्यात पती,दोन मुले आणि चार मुली आहेत.