प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर-पंचगंगा स्मशानभूमी येथे नव्याने बसविण्यात आलेल्या विद्युत व ग्यस दाहिनीची चाचणी करण्यात आली. कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीने यावेळी महानगर पालिका प्रशासनाच्या वतीने सुशांत कांबळे तसेच पंचगंगा स्मशनभूमी कडील सर्व कर्मचारी आणि अधिकारी यांच्यासह मानवसेवा संस्थेचे सर्व सदस्य व पदाधिकारी उपस्थित होते. सीपीआर हॉस्पिटल येथे बेवारसस्थितीत एक व्यक्ती आढळून आली होती.त्याच्यावर सीपीआर रुग्णालयात उपचार चालू असताना त्यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला .त्यानंतर लक्ष्मीपुरी ठाण्याकडून ते बेवारस मयत संस्थेच्या ताब्यात देण्यात आले. यावेळी संस्थेच्या वतीने व विद्युत दाहिनीच्या मदतीने अतिशय सन्मानाने अंत्यसंस्कार करण्यात आले.
यावेळी लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्याचे कर्मचारी गौरव कांबळे तसेच संस्थेचे अध्यक्ष किशोर नैनवानी, सुप्रिया देशपांडे , कॉम्रेड रघुनाथ कांबळे, अमित गोंदकर, सचिन राऊत , अर्जुन कांबळे उपस्थित होते. नव्याने बसवण्यात आलेल्या विद्युत दहिनी ची चाचणी उत्तमरित्या पर पडली . प्रशासनाने उपलब्ध करून दिलेल्या नवीन सोयी सुविधांचा आपण वापर करून प्रशासनाला हातभार लावला पाहिजे तसेच जेणेकरून स्मशनभूमी वरील ताण कमी होण्यास मदत होईल असे यावेळी संस्थे च्या सचिव सुप्रिया देशपांडे यांनी सांगितले.