प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर - करवीर तालुक्यातील परिते येथे सागर धोंडिराम पाटील (वय 35) यांने गुरुवार (दि.20 फ़ेब्रु.) रोजी दुपारच्या सुमारास खडी नावाच्या शेतात शेवग्यांच्या झाडाच्या फांदीस सुती दोरीने बांधून गळ्यात गळफास लावून घेतल्याने सदरचा गळफास त्याच्या नातेवाईकांनी सोडवून बेशुध्दावस्थेत उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले असता त्याचा उपचारापूर्वी मृत्यु झाला.या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे.
यातील मयत सागर ऊस ट्रॅक्टरवर ड्रायव्हर म्हणुन काम करीत होते.त्यांच्या पश्च्यात आई-वडील,भाऊ,बहिण, पत्नी,एक मुलगा आणि मुलगी आहे.
Tags
कोल्हापूर