प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर- पाचगाव येथील प्रसाद मारुती शिंदे (वय 41.रा.प्लॉट नं.34 खडीचा गणपतीच्या पिछाडीस ,पाचगाव) यांच्या राजारामपुरी येथील बंद दुकानातुन चोरट्यांने 40 हजार रुपयांची रोकड आणि शिल्पजा प्रमोद कनगुटकर यांच्या राजारामपुरी 5 व्या गल्लीतील मानसिंग रेसिडेंन्सी येथे 6 व्या मजल्यावर बंद असलेल्या घरातुन 1 लाख 40 हजार रुपये रोख असा एकूण एक लाख 70 हजार रुपये चोरी केल्या प्रकरणी राजापुरी पोलिस ठाण्याच्या शोध पथकाने यश दिपक बरगे (वय 19.रा.मानसिंग रेसिडेन्सी, राजारामपुरी 5 वी गल्ली) याला अटक केली आहे.आज त्याला पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
हा प्रकार सोमवार (दि.03) ते मंगळवार (दि.04) या कालावधीत घडला असून याची फिर्याद प्रसाद शिंदे यांनी राजारामपुरी पोलिस ठाण्यात दिली होती.घटना स्थळी करवीरचे उपविभागीय पोलिस अधिकारी सुजितकुमार क्षीरसागर,राजारामपुरी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुशांत डोके आणि सहा.पोलिस निरीक्षक दत्तात्रय भोजणे यांनी भेट देऊन माहिती घेतली.
अधिक माहिती अशी की,फिर्यादी यांचे राजारामपुरी 5 व्या गल्लीत रियायबल डायग्नेस्टिक्स सेल्स व सर्व्हिसेस नावाचे दुकान आहे आणि शिल्पजा कनगुटकर यांचे राजारामपुरी येथील 5 व्या गल्लीतील मानसिंग रेसिडेन्सी येथे 6 व्या मजल्यावर यांचे फ्लॅट आहे.तो एक महिन्यापासून बंद आहे. चोरट्याने शिंदे यांच्या दुकानातुन आणि कनगुटकर यांचे बंद घर फोडून चोरी केल्याचे निदर्शनास आल्याने त्यांनी राजारामपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.पोलिसांनी या गुन्हयांचा तपास करीत असताना संशयीत चोरट्यास शोध घेऊन त्याला ताब्यात घेतले.त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली .याचा पुढ़ील तपास राजारामपुरी पोलिस ठाण्याचे सहा.पोलिस निरीक्षक भोजणे करीत आहेत.