बक्षीस पत्रात नाव घालण्यासाठी लाचेची मागणी केल्या प्रकरणी पन्हाळा येथील मंडल अधिकारी यांच्यासह तिघांच्यावर गुन्हा दाखल.

 


प्रेस मीडिया लाईव्ह :

मुरलीधर कांबळे :

कोल्हापूर- पन्हाळा तालुक्यातील   कोडोली येथे तक्रारदाराच्या पत्नीचे नाव शेत जमिनीला लावण्यासाठी लाचेची मागणी केल्या प्रकरणी मंडल अधिकारी अरुण भानुदास माळगे (वय49.रा.शिराळा नाका कचरे गल्ली,इस्लामपूर ) योगेश यशवंत गावडे (वय 29.रा.शिनगारे गल्ली ,कोडोली )  आणि सुशांत सुभाष चौगुले (वय 30.रा.शहापूर ,पन्हाळा) यां दोघां  एंजटासह तिघांच्यावर लाचलुचपत पथकाने कारवाई करुन या तिघांच्यावर कोडोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारदार यांच्या वडीलाच्या नावे  पन्हाळा तालुक्यातील कोडोली येथे 10 गुंठे शेतजमीन असून ती जमीन तक्रादार यांच्या आईच्या नावाने बक्षीसपत्र केले होते.सदर बक्षीसपत्र पन्हाळा येथील रजिस्टर कार्यालयात दि.10/01/2025 रोजी दाखल केले होते.  दि.11/01/2025 रोजी गावडे यांनी तक्रारदार यांच्याकडे येऊन सर्कल माळगे यांच्या साठी काम करीत असल्याचे सांगून बक्षीसपत्राची नोंद करण्यासाठी आमच्या कार्यालयात काम आल्याचे सांगितले.त्याची नोंद करण्यासाठी सर्कल माळगे आणि माझ्यासाठी अडीच हजार रुपये द्यावे लागेल.असे म्हणून तक्रारदाराकडे लाचेची मागणी केल्याने तक्रारदार यांनी लाचलुचपत विभागाकडे याची तक्रार दिली.सदर तक्रारीची लाचलुचपत विभागाने याची पडताळणी केली असता गावडे यांनी मंडल अधिकारी माळगे आणि स्वतःसाठी अडीच हजार रुपयांची लाचेची मागणी करत त्यात तडजोड करून दोन हजार रुपये लाचेची मागणी केली.त्याच प्रमाणे चौगुले आणि मंडल अधिकारी माळगे यांनी गावडे यांनी लाचेची मागणी केल्याचा दुजोरा दिला.तसेच माळगे यांनी गावडे यांच्याकडे लाचेची रक्कम  देण्याचे सांगितल्याचे दिसून  आले.त्यानंतर लाचलुचपत पथकाने सापळा रचून तक्रादाकडुन दोन हजारांची लाच घेताना गावडे यांला रंगेहात पकडून कारवाई केली.

ही कारवाई लाचलुचपत विभागाच्या पोलिस उपअधीक्षक वैष्णवी पाटील,पोलिस निरीक्षक बापू सांळूखे ,पोहेकॉ सुनिल घोसाळकर ,सुनिल पाटील,संदिप पवार आणि चालक गजानन कुराडे यांनी केली.

Post a Comment

Previous Post Next Post