प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर- आजरा तालुक्यातील सुळगाव येथे जेवणावळीच्या पार्टीत पाणी कुणी आणायचे या कारणावरुन डोक्यात लोंखडी रॉडने केलेल्या हल्ल्यात मंगेश पांडुरंग सुर्यवंशी (वय 40) हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार चालू आहेत.हा प्रकार हाजगोळी तिट्टा येथे गुरुवारी रात्री उशिरा घडली.जखमी सुर्यवंशी याला उपचारासाठी प्रथम आजरा आणि गडहिग्लज येथे शासकीय रुग्णालयात दाखल केले होते.मात्र त्याची प्रकृती चिंताजनक बनल्याने त्याला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.त्याच्या डोक्यात रॉडने मारल्याने त्याची कवटी फ्रक्चर झाल्याने त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले.
मंगेश सुर्यवंशी हा मुंबई येथील एका खाजगी कंपनीत रखवालदार म्हणुन काम करीत असून चार महिन्यापूर्वी आपल्या गावी आला होता.गुरुवारी रात्री आपल्या साथीदारांसमवेत जेवणाचा बेत वर्देकर शेळी-मेंढ़ी पालन केंद्रावर आखला होता.ठरल्या प्रमाणे रात्री साडे दहाच्या सुमारास जेवणही तयार झाले.मात्र पिण्यासाठी पाणी कुणी आणायचे या कारणातुन आपापसात वादावादी होऊन प्रकरण मारामारी पर्यत गेले.या वेळी रागाच्या भरात मंगेश सुर्यवंशी यांच्या डोक्यात लोंखडी रॉड मारल्याने त्यात तो गंभीर जखमी झाल्याने त्याला आजरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार घेऊन पुढ़ील उपचारासाठी गडहिग्लज येथे प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार घेऊन पुढ़ील उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले.त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार चालू आहेत.या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे.