.
प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर- राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक स्नेहल नरवणे यांना गोवा बनावटीची दारुची वाहतूक टेम्पोतुन फोंडा घाट मार्गे होणार असल्याची माहिती मिळाली होती.मिळालेल्या माहितीनुसार या पथकाने सोमवारी रात्रीच्या सुमारास राधानगरी रोडवर सापळा रचून टेम्पो पकडून त्याची झडती घेतली असता त्यात गोवा बनावटीची दारुचे विविध कंपन्यांचे काही बॉक्स आढ़ळले.या प्रकरणी टेम्पो चालक विठ्ठल सुभाष कुटे (वय 43.रा.सोनगिरी ,ता.भूम) याला अटल करून त्याला दोन दिवसांची पोलिस कोठडीसुनावली आहे.
ही कारवाई निरीक्षक संजय शिलेवंत,दुय्यम निरीक्षक सत्यवान भगत आणि संदिप जाधव,सहा.दुय्यम निरीक्षक प्रदिप गुरव ,जवान देवेंद्र पाटील,आशिष पोवार ,सुशांत पाटील,आदर्श धुमाळ पंकज खानविलकर यांनी केली असून या गुन्हयांचा पुढ़ील तपास दुय्यम निरीक्षक सत्यवान भगत करीत आहेत.