प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर-करवीर तालुक्यातील शिंगणापूर बंधारयात सोमवारी सकाळी सापडला.सुरज शिवाजी पाटील (वय 35) असे त्याचे नाव असून तो शनिवारी रात्री पासून बेपत्ता होता.या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे.
यातील मयत सुरज हा एका फायनान्स कंपनी मध्ये नोकरीस होता.शनिवारी रात्री ड्युटी संपवून घरी येत असताना बेपत्ता झाले होते.घरी परत न आल्यामुळे नातेवाईकांनी शोध घेण्याचा प्रयत्न केला असता ते सापडले नसल्याने करवीर पोलिस ठाण्यात मिसिंग असल्याची नोंद केली होती.आज सकाळी सुरज याचा मृतदेह शिंगणापूर बंधारा येथे पाण्यावर तरंगताना आढ़ळून आला.सदरचा मृतदेह पाण्याबाहेर काढ़ुन शवविच्छेदनासाठी सीपीआर रुग्णालयात हलविण्यात येऊन मृतदेहाची उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला.त्याच्या पश्च्यात आई-वडील पत्नी ,मुलगा आणि बहिण असा परिवार आहे.