तळाशी येथे शिवीगाळ करुन तरुणाला मारहाण.

 

प्रेस मीडिया लाईव्ह :

मुरलीधर कांबळे :

तळाशी - राधानगरी तालुक्यातील तळाशी येथील साहिल नामदेव कांबळे (वय 21) याला रहात असलेल्या तळाशी गावातील गावतळ्या जवळ अंबाबाई मंदिर जवळ झालेल्या मारहाणीत गंभीर जखमी  झाल्याने प्रथम उपचार ठिकपुर्ली येथे खाजगी रुग्णालयात उपचार घेऊन पुढ़ील उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले.या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे.

अधिक माहिती अशी की,तळाशी गावी दोन गट असून एका गटाने मिरवणुकीने शिवज्योत आणली होती.तर संयुक्त तळाशीकर नावाने मंडळ असून या मंडळातील तरुणांनी शिव ज्योत आणली होती.त्याची मिरवणूक चालू असताना या मंडळातील कार्यक्रर्ता साहिल नामदेव कांबळे हा मोटारसायकल घेऊन गावतळ्या जवळ गेला असता विरुध्द गटातील एका (राधानगरी पंचायत समितीचा माजी सभापती)   मोठ्या नेत्याने रस्त्यात अडवून शिवीगाळ करुन  त्यानी आणि त्याच्या पुतण्याने  साहिल याच्या डोक्यात दगड मारुन गंभीर जखमी केले अशी माहिती त्याच्या नातेवाईकांनी दिली.या हाणामारीचा गुन्ह्याची नोंद राधानगरी पोलिस ठाण्यात झाली  असल्याचे समजते.

Post a Comment

Previous Post Next Post