मटका बुक्की मालक सम्राट कोराणे याच्या पोलिस कोठडीत वाढ़ , 25 फ़ेब्रु.पर्यत पोलिस कोठडी.

 

प्रेस मीडिया लाईव्ह :

मुरलीधर कांबळे :

कोल्हापूर- गेल्या सहा वर्षा पासून फरार असलेला मटका बुक्की मालक सम्राट कोराणे याची आज पोलिस कोठडी संपल्याने पोलिसांनी त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने पुन्हा त्याला 25 फ़ेब्रु.पर्यत पोलिस कोठडी सुनावली आहे.

गेल्या सहा वर्षा पासून पोलिसांना चकवा देत होता.पोलिसांनी त्याला जंग जंग पछाडलं पण तो पोलिसांना मिळून आला नाही.कोराणे यांनी आपल्या परीने जामीना साठी खूप प्रयत्न केले.पण त्याचा जामीन अर्ज फ़ेटाळल्यामुळे तो स्वतःच न्यायालयात शरण आला न्यायालयाने त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली होती.या प्रकरणाचा तपास शहर पोलीस उपअधीक्षक अजित टिके यांनी तपासासाठी कोराणे याचा ताबा मिळविण्यासाठी न्यायालयात अर्ज केला होता.न्यायालयाने अर्ज मंजूर केल्यानंतर त्याला तात्काळ कंळबा कारागृहातुन ताबा घेऊन पोलिसांनी कोराणे याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला अकरा दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती.आज पोलिस कोठडीची मुदत संपल्यावर पुन्हा कोराणे याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने पुन्हा कोराणे याला 25 फ़ेब्रु.पर्यत पोलिस कोठडी सुनावली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post