प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर - कागल तालुक्यातील बोरवडे येथे धनशांती मल्टी ट्रेडर्स सर्व्हिसेस ही एलएलपी नावाची कंपनी काढ़ुन गुंतवणूकदारांना जादा परताव्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांची फसवणूक करून दोन वर्षांपासून फरारी झालेला आरोपी वैभव कृष्णा पाटील (वय 35.रा.माळवाड ,पाडळी खुर्द्द.ता.करवीर ) याला स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने अटक केली.
वरिष्ठ पोलिस अधिकारी यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाण्यातील प्रभारी आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाला फरारी आरोपींचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या.
या पथकातील पोलिसांनी गुरुवार (दि.27) रोजी रात्री एक ते पाच या वेळेत कोम्बिंग ऑपरेशन राबविण्यात आले होते.सदर कोम्बिंग ऑपरेशन वेळी फरार असलेला आरोपी वैभव पाटील हा पाडळी खुर्द्द परिसरात असलेल्या माळवाड येथे असल्याची माहिती पोलिस रोहित मर्दाने व विजय इंगळे यांना मिळाली.मिळालेल्या माहितीनुसार स्थानिक गुन्हे अन्वेषणचे सहा.पोलिस उपनिरीक्षक जालिंदर जाधव,पोलिस रोहित मर्दाने,विजय इंगळे,युवराज पाटील,लखन पाटील,सोमराज पाटील,संजय पडवळ,सुशिल पाटील,आंबी आणि राजू येडगे यांनी सापळा रचून ताब्यात घेऊन त्याच्यावर मुरगूड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असल्याने पुढ़ील तपासासाठी मुरगूड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
आरोपी वैभव पाटील आणि त्याच्या साथीदारांनी धनशांती मल्टी ट्रेडर्स सर्व्हिसेस ही LLP. नावाची कंपनी स्थापन करून गुंतवणुकीवर एक लाखाला अकरा हजार चारशे रुपये देण्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांची फसवणूक केली होती.या मुळे त्यांच्यावर मुरगूड पोलिस ठाण्यात गुन्हा आठ जणांवर गुन्हा दाखल झाला होता.पोलिसांनी या अगोदर दत्तात्रय दादु पाटील (रा.सरवडे) ,सौ.दिपाली दत्तात्रय पाटील (रा.बोरवडे), अजित पाटील (रा.सांगली) आणि नितीन जगन्नाथ गोते (रा.नायगांव ,पुणे) या पाच जणांना अटक केली होती.मात्र यातील चौघे जण पोलिसांना गुन्हा दाखल झाल्या पासून मिळून येत नव्हते.त्यातील वैभव पाटील याला अटक करून इतर तिघांचा पोलिस शोध घेत आहेत.
यातील आरोपी दत्तात्रय पाटील यांच्याकडे 66 कोटी रुपये गुंतवणूकदारांचे जमा झाले होते.त्यातील 1 कोटी 20 लाख रुपये आरोपी वैभव पाटील यांच्याकडे दिल्याचे दत्तात्रय पाटील यांनी सांगितले होते.सध्या दत्तात्रय पाटील हे जेल मध्ये आहेत.
ही कारवाई पोलिस अधीक्षक मा.महेंद्र पंडीत,अप्पर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक रविंद्र कळमकर ,पोलिस उपनिरीक्षक जालिंदर जाधव यांच्यासह त्यांच्या पथकाने केली.