"2025 भीमा कृषि प्रदर्शनाचे" मोठ्या उत्साहात उदघाटन. शेतकरी वर्गाला अस्थिर करण्याचे प्रयत्न.-कृषिमंत्री कोकाटे.

 



प्रेस मीडिया लाईव्ह :

मुरलीधर कांबळे :

कोल्हापूर- मेरीवेदर मैदानावर "भीमा कृषि प्रदर्शनाचे मोठ्या उत्साहात उदघाटन मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते झाले. यावेळी माजी आ.महादेवराव महाडिक ,खा.धनंजय महाडिक, मा.आ.सुरेश हाळवणर ,महेश जाधव,प्रा.जयंत  पाटील,धैर्यशील माने,राहुल चिकोडे आणि विजय जाधव यांच्यासह शेतकरी वर्ग, महिला बचत गट ,राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

महाराष्ट्रातील अस्थिर असलेला शेतकरी वर्गाला स्थिर करण्याचे प्रयत्न करणार असून प्रत्येक गावागावात हवामानाचा अंदाज येण्यासाठी हवामान यंत्र देणार असल्याचे या वेळी मंत्री कोकाटे यांनी सांगितले.' एआय' च्या माध्यमातून शेतकरी वर्गाला नवनवीन तंत्रज्ञानाची माहिती आणि त्याचे उत्पादन कसे करता येईल यांची व्यवसथा करू.नागरिकांच्या आरोग्यासाठी शेतकरी वर्गाने भर द्यावा.असे ही सांगीतले.

हे प्रदर्शन 21 फ़ेब्रु.ते 24 फ़ेब्रु.चार दिवस असणार आहे.यात चारशे पेक्षा जास्त स्टॉलची सोय केली आहे.यात खास आकर्षण जगातील सर्वात ऊंच "विधायक "रेडा हा एसीत रहातो व स्विमिंग पूलमध्ये अंघोळ करतो.या शिवाय शेतकरी वर्गाला मान्यवरांचे मार्गदर्शन रोज दुपारी 4 ते 5 या वेळेत लाभणार आहे.

Post a Comment

Previous Post Next Post