जलजीवन मिशन पाईपलाईनचे काम तात्काळ पूर्ण करा. शिंगणापूर ग्रामपंचायतला हणमंतवाडी ग्रामपंचायतच्या वतीने निवेदन देऊन मागणी.

 

प्रेस मीडिया लाईव्ह:

मुरलीधर कांबळे :

कोल्हापूर - हणमंतवाडी येथील शिंगणापूर कमानीपासून ते हणमंतवाडी कमानीपर्यंत रस्त्याच्या कामाचे उद्घाटन होवून एक वर्ष होऊन गेले तरी सुध्दा  शिंगणापूर जलजीवन मिशनच्या  पिण्याच्या पाईपलाईनला जागोजागी गळती लागल्यामुळे हणमंतवाडी रस्त्याचे काम तीन  महिने प्रलंबित आहे. हे पाईपलाईनचे काम तात्काळ  पूर्ण करण्यासाठी 'ग्रामपंचायत हणमंतवाडी' च्या वतीने सरपंच व ग्रामस्थांनी शिंगणापूरच्या लोकनियुक्त सरपंच रसिका अमृत पाटील यांना निवेदन देऊन मागणी केली आहे.

                         

     शिंगणापूर कमानीपासून हणमंतवाडी कमान रस्त्याचे काम मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत सुरू आहे. शिंगणापूर जलजीवन मिशन पिण्याच्या पाईपलाईनला गळती लागल्यामुळे त्याचे काम तीन  महिने सुरू आहे. पाईपलाईन बसविण्यासाठी केलेली खुदाई व पाईपलाईन ची गळती वेळेत न काढल्यामुळे रस्त्याच्या कंत्राटदाराने पाईपलाईन चे काम पूर्ण झाल्याशिवाय रस्ता होवू शकत नसल्याची भूमिका स्पष्ट केली आहे. त्यामुळे हणमंतवाडी गावात केएमटी बस शिंगणापूर कमानीपर्यंतचं येते, रस्ता खराब असल्याने वडापही गावात येत नाही, शालेय विद्यार्थी महिला यांना शिंगणापूर कमानी पर्यंत एक किलोमीटर अंतर पायी प्रवास करावा लागतो. 

 गेल्या चार  महिन्यापासून  हणमंतवाडीकर करत असलेल्या कसरतीचे शिंगणापूर ग्रामपंचायतीला जरा देखिल सोय-सुतक दिसत नसल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. सदरचा मार्ग 'शिंगणापूर ग्रामपंचायत' हद्दीत येत असल्याने हणमंतवाडी ग्रामपंचायत शिंगणापूर ग्रामपंचायतच्या कामात हस्तक्षेप करू शकत नाही. असे असले तरी होणाऱ्या त्रासाला कंटाळून ग्रामस्थांनी हणमंतवाडी सरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांना विनंती करून शिंगणापूरच्या लोकनियुक्त सरपंच रसीका अमृत पाटील यांना निवेदन दिले. त्यानंतर पाटील यांनी आश्वासन देणे अपेक्षित असताना त्यांचे पती अमर पाटील यांनीच मी लक्ष घालून काम पूर्ण करून देतो अशी ग्वाही दिली. याबाबत हणमंतवाडी सरपंच तानाजी नरके यांनी वरिष्ठांनी सबंधित प्रकरणात लक्ष घालून पाईपलाईन व रस्त्याचे काम गतीने पूर्ण व्हावे यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले. यावेळी हणमंतवाडी उपसरपंच संगीता शिनगारे, सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ व गावातील तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post