प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर- लक्ष्मीपुरी गुन्हे शोध पथकाने दोघां मोटारसायकल चोरट्यांना अटक करून त्यांच्या कडील 3 लाख 15 हजार रुपये किमंतीच्या 7 मोटारसायकली जप्त करून या प्रकरणी राहुल शिवाजी सांळूखे (वय 20.रा.तळ्याजवळ,बीड शेड फाटा .मुळ गांव सागरमाळ डवरी वसाहत,राजारामपुरी) व राद्येय अनिल पाथरुट (वय 21.पाथरुट वसाहत,दौलतनगर ) यांना अटक केली.
जुना शिंगणापूर परिसरात असलेल्या विश्वभारती कॉलनी येथून दि.17 जाने.ते 18 जाने.या कालावधीत रहात असलेल्या घरा जवळून मोटारसायकली चोरीस गेल्या होत्या.
सदर गुन्हयांचा तपास करीत असताना बुधवार (दि.26 फ़ेब्रु) रोजी पोलिस प्रितम मिठारी,मंगेश माने,तानाजी दावणे आणि किशोर पवार हे पेट्रोलिंग करीत असताना लक्षतीर्थ वसाहत येथील किडकाडी देवळाजवळ दोघे जण विना नंबर प्लेट असलेली मोटारसायकल चालवित असल्याची माहिती मिळाली असता त्या ठिकाणी जाऊन विना नंबर प्लेट असलेली मोटारसायकल ताब्यात मिळालेली मोटारसायकल चोरीची असून लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असल्याचे समजले.त्या नंतर पोलिसांनी दोघांना अटक करून त्यांना आज न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 3 मार्च पर्यत पोलिस कोठडी सुनावली आहे.पोलिसांनी या दोन आरोपीकडे विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्यांनी लक्ष्मीपुरी,जुना राजवाडा,करवीर आणि सातारा जिल्हयातील कराड येथून मोटारसायकली चोरल्याचे निष्पन्न झाले.
ही कारवाई लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक श्रीराम कन्हेरकरसो यांच्यासह गुन्हे शोध पथकाने केली.