प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर- करवीर तालुक्यातील कंळबा येथे गर्भलिंग निदान प्रकरणातील सोनोग्राफी मशीनसह फरार झालेला सुयश सुनिल हुक्केरी (वय 30.रा.फुलेवाडी रिंगरोड ,कोल्हापूर) या मुख्य सुत्रधारास करवीर पोलिसांनी शुक्रवारी पहाटे अटक केली.आज सुयश हुक्केरी या न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला 25 फ़ेब्रु. पर्यत पोलिस कोठडी सुनावली आहे.पोलिसांनी सुयश हुक्केरी याच्याकडे अधिक चौकशीत एका संशयीताचे नाव उघड झाले आहे.त्याला लवकरच ताब्यात घेणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
कळंबा येथे गर्भलिंग निदान प्रकरणी श्रध्दा हॉस्पिटल मध्ये छापा टाकला असता यातील मुख्य संशयीत सुयश हुक्केरी हा सोनोग्राफी मशीनसह फरार झाला होता.