प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर- शाहुवाडी तालुक्यातील ऐनवाडी येथील निलेश रामचंद्र सुतार (वय 30.सध्या रा.विरार ,मुंबई) याला कांदीवली येथे प्लॅटफॉर्म नं.4 वर विरार ते चर्चगेट या लोकल रेल्वेने पाठीमागून धडक दिल्याने जखमी झाला होता.त्याला उपचारासाठी ठाणे येथील मीरारोड येथे ऑरबिट हॉस्पिटल मध्ये दाखल केले होते.तेथे उपचार घेऊन पुढ़ील उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले .हा प्रकार गुरुवार (दि.06फ़ेब्रु.) रोजी दुपारी साडे तीनच्या सुमारास घडला होता.या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे.
अधिक माहिती अशी की,यातील जखमी यांचे आई-वडील गावी रहात असून निलेश आणि त्याचा लहान भाऊ मुंबई येथे जॉबला असून ते विरार येथे एकत्र रहात होते.निलेश हा (दि.06) रोजी कामानिमित्त कांदीवली येथे आला होता.तो परत जाण्यासाठी कांदीवली येथे प्लॅटफॉर्म नं.04 वर रेल्वेची वाट पाहत असताना त्याला पाठीमागून येत असलेल्या रेल्वेने जोराची धडक दिल्याने जखमी झाला होता.या अपघाताची माहिती तेथील रेल्वे पोलिसांना समजताच पोलिसांनी जखमीला कांदीवली येथील शताब्दी रुग्णालयात दाखल करून त्याच्या नातेवाईकांना या घटनेची माहिती दिली.त्यानी शताब्दी रुग्णालयात उपचार घेऊन पुढ़ील उपचारासाठी ऑरबिट हॉस्पिटल ठाणे येथे दाखल केले होते.तेथे उपचार घेऊन पुढ़ील उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले .अशी माहिती त्याच्या नातेवाईकांनी दिली.