प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे:
कोल्हापूर- गडहिग्लज येथे नेहरुनगर परिसरात रहात असलेल्या शोभा सदाशिव धनवडे (वय 62) या महिलेचा दोरी आवळून खून केल्या प्रकरणी संशयीत आरोपी गुरुन्नाथ उर्फ पिंटू भैरु चौगुले (रा.हटटी बसवाना मंदीर जवळ,गडहिग्लज) याला गडहिग्लज,स्थानिक गुन्हे अन्वेषण कोल्हापूर, आजरा ,चंदगड आणि नेसरी पोलिस यांनी संयुक्तरित्या कारवाई करुन आरोपीला 24 तासात अटक केली.
अधिक माहिती अशी की,नेहरुनगर परिसरात रहात असलेल्या शोभा सदाशिव धनवडे या महिलेचा रविवार (दि.23) रोजी अंगावरील दहा तोळे सोन्याचे दागिने लुटून गळा दाबून खून करून अनोळखी व्यक्तीने पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने संशयीतानी सदर महिलेचा मृतदेह विहीरीत फ़ेकण्याचा प्रयत्न केला होता.मात्र फ़ेकलेला मृतदेह झाडाच्या झुडपात अडकल्याने या खूनाला वाचा फुटली.दरम्यान मयत महिलेच्या मुलाने आईचा खून झाल्याची फिर्याद गडहिग्लज पोलिस ठाण्यात दिल्याने पोलिसांनी दिलेल्या फिर्यादी वरुन अनोळखी व्यक्तीच्या विरोधात खूनाचा गुन्हा दाखल केला.
या खूनाच्या गुन्हयांचे गांभीर्य ओळखून पोलिस अधीक्षक मा.महेद्र पंडीत यांनी मार्गदर्शन करुन खूनाचा गुन्हा उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या होत्या.त्याच प्रमाणे गडहिग्लजचे अप्पर पोलिस अधीक्षक निकेश खाटमोडे-पाटील , गडहिग्लजचे, उपविभागीय पोलिस अधिकारी रामदास इंगवले स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक रविंद्र कळमकर ,गडहिग्लज पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अजयकुमार सिंदकर यांनी घटना स्थळी भेट देऊन गुन्हयांच्या तपासकामी मार्गदर्शन करुन सूचना दिल्या होत्या.या गुन्हयांचा तपास गडहिग्लज,स्थानिक गुन्हे अन्वेषण पथक ,आजरा ,चंदगड आणि नेसरी पोलिसांनी संयुक्तरित्या तपास चालू केला.
सदर गुन्हयांचा तपास करीत असताना गडहिग्लजचे उपविभागीय पोलिस अधिकारी रामदास इंगवले आणि पोलिस सतीश बंडा पाटील यांना बातमी मिळाली की ,गडहिग्लज येथे हटटी बसवाना मंदीर जवळ रहात असलेला गुरुन्नाथ उर्फ पिंटू भैरु चौगुले याचे फिर्यादीच्या वडीलांच्या घरासमोर किराणा मालाचे दुकान भाड्याने चालवित होता.मात्र जागा मालकाने नवीन बांधकाम चालू करणार असल्याचे सांगितल्याने त्याचे किराणामालाचे दुकान बंद पडले.त्यामुळे संशयीत आरोपी हा महिंद्रा ट्रयक्टर शोरुम कंपनीत वॉचमन म्हणून काम करीत होता.आरोपीने घर बांधण्यासाठी आणि गाडी घेण्यासाठी 12 हजार रुपये कर्ज घेतल्याने ते त्याला फ़ेडता येत नव्हते.खून झालेल्या महिलेने संशयीत आरोपीला 10 हजार रुपये उसने दिले होते.त्यामुळे महिलेने आरोपीकडे उसने दिलेले पैसे वारंवार परत मागू लागल्याने आरोपीने सदर महिलेस मोटारसायकल बसवून आपल्या घरी नेले .तेथे आरोपीने पाठीमागून दोरीने महिलेचा गळा आवळून खून केला.आरोपीने मयत महिलेच्या अंगावरील सर्व दागिने काढ़ुन घेऊन तिचा मृतदेह मारुती ओम्नी गाडीत ठेवला.आणि रविवारी सकाळी आरोपीने त्या महिलेचा मृतदेह अशोक आजरी यांच्या शेतात असलेल्या विहीरीत टाकण्याचा प्रयत्न केला होता.मात्र मृतदेह तेथील झुडपात अडकल्याने या खूनाला वाचा फुटली.आणि कोणताही पुरावा नसताना पोलिसांनी 24 तासात या खूनातील आरोपीचा शोध घेऊन त्याला अटक करून गुन्हयांत वापरलेली मोटारसायकल आणि मारुती ओम्नी गाडी पोलिसांनी जप्त केली.
या गुन्हयांचा तपास पोलिस अधीक्षक मा.महेंद्र पंडीत, गडहिग्लजचे अप्पर पोलिस अधीक्षक निकेश खाटमोडे-पाटील,गडहिग्लजचे उपविभागीय पोलिस अधिकारी रामदास इंगवले यांच्या मार्गदर्शनाखाली गडहिग्लज पोलिस ठाण्यातील पोलिस पथक आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण पथक यांनी केला.