प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर- कागल तालुक्यातील सेनापती कापशी येथील सगुणा तुकाराम जाधव (वय 82) या वृध्देचा खून केल्या प्रकरणी नातू गणेश राजाराम चौगुले (वय 28.रा.विक्रमनगर ,इंचलकरंजी )व त्याचा साथीदार नरेश उर्फ नरेंद्र दगडू करपे (वय 25.रा.म्हसोबा गल्ली ,विक्रमनगर ,इंचलकरंजी ) या दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने अटक करून या गुन्ह्यात सामील असलेल्या एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे.
मंगळवार (दि.11) रोजी दुपारी तीन ते रात्री साडे नऊच्या सुमारास घरात एकटी असलेल्या वृध्देचा खून करून तिच्या कडील साडेचार तोळ्याच्या पाटल्या आणि पाऊण तोळ्याची बोरमाळ असे एकूण चार लाख रुपये किमंतीचे सोन्याचे दागिने चोरत्यांनी लांबविले होते.याची फिर्याद नातू सुशांत पुंडलीक जाधव (वय 31.रा.सेनापती कापशी ) यांनी मुरगूड पोलिस ठाण्यात दिली.दिलेल्या फिर्यादी वरुन पोलिसांनी खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
या घटनेचे गांभीर्य ओळखून वरिष्ठ पोलिस अधिकारी यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक रविंद्र कळमकर यांना या गुन्हयांतील आरोपीचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या.त्या प्रमाणे पोलिस निरीक्षक रविंद्र कळमकर,यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.पोलिस निरीक्षक चेतन मसुटगे व पोलिस उपनिरीक्षक शेष मोरे यांची पथके तयार करून आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली.सदर घटनेतील आरोपीचा शोध घेत असताना या पथकातील पोलिस अंमलदार विजय इंगळे,रोहित मर्दाने आणि प्रदिप पाटील यांना या गुन्ह्यातील आरोपी गणेश चौगुले हा बालाजी चौक ,विक्रमनगर इंचलकरंजी येथे असल्याची माहिती मिळाली असता पोलिसांनी त्या परिसरात सापळा रचून आरोपी गणेश चौगुले याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने काढ़लेले कर्ज फ़ेडण्यासाठी इंचलकरंजी येथे विक्रमनगर येथील रहाते घर विकले होते.तरी सुध्दा लोकांचे घेतलेले कर्ज फिटले नसल्यामुळे आजी सगुणा जाधव हिच्या नावावर बँकेत दोन लाख रुपयांची असल्याने आजीकडे उसने एक लाख रुपयांची मागणी केली होती.मात्र आजीने पैसे देण्यास नकार दिल्याने मित्राच्या मदतीने आजीचा गळा आवळून खून केल्याचे पोलिसांना सांगितले.त्यानंतर पोलिसांनी त्याचा मित्र नरेश उर्फ नरेंद्र करपे याला आणि एका अल्पवयीन मुलाला इंचलकरंजी शहरातून ताब्यात घेतले.सदर आरोपींच्या कडुन सोन्याच्या पाटल्या ,कर्णफुले आणि गुन्हयांत वापरलेली मोटारसायकल असा एकूण 4 लाख रुपये किमंतीचा मुद्देमाल जप्त करून यातील दोघां आरोपींसह एका अल्पवयीन मुलाला पुढ़ील तपासासाठी मुरगूड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
ही कारवाई पोलिस अधीक्षक मा.महेंद्र पंडीत यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक रविंद्र कळमकर, सहा.पोलिस निरीक्षक चेतन मसूटगे,पोलिस उपनिरीक्षक शेष मोरे पोलिस विजय इंगळे,रोहित मर्दाने,प्रदिप पाटील,राजू कांबळे,नामदेव यादव,संदिप बेंद्रे,महेश खोत,रुपेश माने,प्रशांत कांबळे महादेव कुराडे सायबर पोलिस ठाण्याचे पोसई अतिश म्हेत्रे व विनायक बाबर यांनी केली.