प्रेस मीडिया लाईव्ह ;
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर- पाठीत आणि छातीत अचानक दुखायला लागल्याने ज्योतिनाथ अर्जुन गुरव (वय 27.रा.सुपाजागीर ,ता.गंगाखेड जि.परभणी) यांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला.हा प्रकार रविवार (दि.09 फ़ेब्रु.) रोजी सायंकाळी साडेपाचच्या त्यांचा मृत्यु झाला.या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे.
यातील मयत हा अविवाहित असून पुणे येथे ड्रायव्हर म्हणुन काम करीत होता.इस्लामपुर येथे त्याच्या नातेवाईकांच्या घरी कार्यक्रमासाठी आला होता.तेथून रविवार (दि.09 फ़ेब्रु.) रोजी सकाळी आपल्या नातेवाईकांच्या समवेत देवदर्शनासाठी जोतिबा डोंगर येथे आले होते.अचानक त्याच्या पोटात आणि छातीत दुखू लागल्याने त्यांना उपचारासाठी जोतिबा डोंगर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार घेऊन पुढ़ील उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले असता त्यांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला.