प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर - इंचलकरंजी येथील जर्मनी गॅंगच्या सदस्यांनी भरचौकात वाढदिवस साजरा केल्याची माहिती मिळाली असता कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री महेंद्र पंडित यांनी इचलकरंजी येथील जर्मनी गॅंगवर कारवाई करण्याच्या स्थानिक गुन्हे शाखा व शिवाजीनगर पोलीस ठाण्याला सूचना दिल्या होत्या.
त्या अनुषंगाने इचलकरंजी येथील जर्मनी गॅंगचे सदस्य यांना स्थानिक गुन्हे शाखा कोल्हापूर येथे आणून चांगला पाहुणचार करुन समज देण्यात आली. त्याचप्रमाणे जर्मनी गॅंग यांनी ज्या ठिकाणी केक कापला होता त्या ठिकाणी त्यांना नेऊन त्यांच्याकडून पुन्हा असे कृत्य होणार नाही याबाबत त्यांना समज देण्यात आली.