प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर- आपल्याला पाहिजे त्या ठिकाणी बदली करण्याचे आमिष दाखवून प्रमोद नरसिंगा बेनाडे (वय 51.रा.राजमाने हायस्कूल जवळ रुई,ता.हातकंणगले )याची साडे तेरा लाख रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणी मनोज प्रकाश सबनीस (रा.जी.के.नगर तारदाळ ,शहापूर ) त्याच्या विरोधात शाहुपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.याची फिर्याद प्रमोद नरसिंगा बेनाडे यांनी शाहुपुरी पोलिस ठाण्यात दिली.
यातील फिर्यादी बेनाडे आणि संशयीत सबनीस एकमेकांचे ओळखीचे आहेत.बेनाडे यांना इच्छित स्थळी बदली हवी होती.याचा गैरफायदा घेऊन संशयीत सबनीस यांने बेनाडे यांना माझी मंत्र्यासह काही वरिष्ठ अधिकारी यांच्याशी ओळख आहे.असे भासवून त्या वरिष्ठ पोलिस अधिकारी यांचा मो.नं.8552989808 या वर तुमची हायवे ट्राफिक येथे बदली करुन देईन.असे सांगत त्यांचा विश्वास संपादन करून बेनाडे यांच्या मार्फत साक्षीदारांकडुन कोल्हापूर येथील परिख पूला जवळील इंन्डसइंड बँक. दि.1 डिसे.23 ते 31एप्रिल 24 या कालावधीत वेळोवेळी रोखीने आणि गुगल पे द्वारे असे एकूण 13 लाख 60 हजार रुपये बदलीची प्रोसेस फि म्हणून घेतली.पण बेनाडे यांची बदली काही झाली नाही.याबाबत सबनीस यांच्याकडे विचारणा केली असता त्यानी टाळाटाळ केली.फिर्यादी आणि साक्षीदार यांची कोठेही बदली न करता संशयीत सबनीस यांनी विश्वासघात करून फसवणूक केल्या प्रकरणी( दि.07) रोजी संशयीत सबनीस विरोधात गुन्हा दाखल केला असून याचा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस उपनिरीक्षक जालिंदर जाधव हे करीत आहेत.
यातील काही कर्तव्य बजावत असलेल्यांना आपल्या सोयी साठी बदली हवी असते.त्या साठी ओळखीच्या हस्तका मार्फत फिल्ड़ींग लावली जाते.त्या साठी आर्थिक नैवेद्य दिला जातो.पण अशांना वरिष्ठ पावत नाहीत.त्या मुळे असे फसवणूकीचे प्रकार घडतात.जर कारवाई करणारेच बदली साठी आर्थिक नैवेद्य दाखवित असतील तर सर्व सामान्य नागरिकांचे काय?.यातील काहीनी इच्छित स्थळी बदली साठी फिल्ड़ींग लावली असून त्यासाठी 50 हजारा पासून लाखांत मध्यस्थांना दिल्याचे समजते.पण त्यांची बदली काही झाली नाही.